कुष्ठ रोग पूर्ण पणे बरा होऊ शकतो
डॉ.रुपेश खडसे साथ रोग नियंत्रण अधिकारी यांचे मार्गदर्शन

अमरावती /8 फेब्रुवारी – महानगर पालिका कार्यक्षेत्रात पठाण चौक आरोग्य केंद्र अंतर्गत अंजुमन – इ ख्याल उर्दू शाळेत कुष्ठ रोग जागृती अभियान अंतर्गत शाळेतील मुलांना आजार बाबत कार्यशाळा घेण्यात आली सदर कार्यशाळेचे आयोजन मनपा आयुक्त सौम्या शर्मा – चांडक अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक , डॉ. विशाल काळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा अमरावती तसेच मा. डॉ. शरद जोगी, जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शहरी आरोग्य केंद्र पठाण चौक चे डॉ. निगार खान यांच्या मार्गदर्शनाखाली अंजुमन उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळा नूर नगर अमरावती येथे स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान व राष्ट्रीय कीटकजन्य नियंत्रण कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. रुपेश खडसे साथरोग अधिकारी मनपा आरोग्य विभाग अमरावती यांनी भूषवले. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांचे फुल पुष्पगुच्छ देऊन शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच कुष्ठरोगांविषयी शपथ डी. एम बरडे, आरोग्य सेवक यांनी दिली. कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत कुष्ठरोगाच्या आजाराविषयी संपूर्ण माहिती सौ संगीता फुंडे, आरोग्य अधिपरिचारिका तसेच सौ वैशाली बुरणासे यांनी दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. रुपेश खडसे यांनी कुष्ठरोगाचा आजार औषधोपचार करण्यास योग्य असून विद्यार्थ्यांना कुष्ठरोगांचे फ्लॅश कार्ड दाखवून कुष्ठरोगाचे लक्षणे तसेच उपचार याविषयी संपूर्ण माहिती दिली. कुष्ठ रोग हा पुण्य – पाप मुळे बरा किंवा वाईट होत नाही तर तो मायकोबैक्ट्रीम लेप्री नावाच्या जीवानु मुळे होतो फिकट लाल कलर चट्टा चेहरा व हात पाय वर दिसला आणि त्या चट्यावर संवेदना होत नसल्यास ताबडतोब आपल्या महानगर पालिकेच्या जवळपास च्या आरोग्य केंद्र येथे जाऊन डॉक्टर यांना दाखवणे आपल्या शहरी आरोग्य केंद्रात तपासणी ही संपूर्ण मोफत असून औषध सुद्धा मोफत आहे त्या मुळे आजार हा त्वरित औषध उपचार केल्यास नाहीसा होतो अशा आजार साठी कोणीही भोंदू बुवा बाजी करणार्या कडे जाऊ नये सर्व उपचार उपलब्ध आहे असे सांगितले तसेच अध्यक्षांनी डेंगू मलेरिया चिकनगुनिया या आजाराविषयी मार्गदर्शन करून प्रत्येकाने आपल्या परिसरातील साफसफाई व स्वच्छता ठेवल्यास कीटकजन्य आजारांपासून आळा घालता येईल व डेंगू मलेरिया या आजारांपासून मुक्त होईल असे संबोधन केले. श्री मिर्झा नईम खान, मुख्याध्यापक यांनी कार्यक्रम घेण्यास प्रोत्साहित केले. याप्रसंगी श्री शशिकांत जयस्वाल, आरोग्य निरीक्षक हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.




