तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण

अंजनगाव, चांदुरबाजार, वरूड तालुक्यातील घटना

पोलीस प्रशासनाची तपासासाठी विशेष मोही

अमरावती/22 मे– जिल्ह्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांनी मोठी खळबळ उडाली आहे. अंजनगाव सुर्जी चांदूर बाजार आणि वरुड या तीन स्वतंत्र पोलीस ठाणे हद्दीतून तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
या घटनांमुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाने या तिन्ही प्रकरणांचा गांभीर्याने तपास सुरू केला आहे. वरुड पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी नीलेश 27 यांची भाची सुट्टीनिमित्त घरी आली होती. 20 मे रोजी नीलेश यांनी तिला आणि जावयाला वरुड बसस्थानकावर सोडले. जावयाने तिला मोर्शीला जाणार्‍या बसमध्ये बसवले परंतु ती तरुणी घरी पोहोचली नाही. या घटनेने नीलेश यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. दुसरी घटना चांदूर बाजार पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. येथील एक अल्पवयीन तरुणी 20 मे रोजी कामानिमित्त घराबाहेर पडली होती. दिवसभर उलटूनही ती घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोधाशोध केली मात्र तिचा ठावठिकाणा लागला नाही. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. तिसरी घटना अंजनगाव सुर्जी येथे समोर आली असून किशोर 47 यांनी दिलेल्या तक्रारीनुसार धीरज 29 या तरुणाने त्यांच्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेले आहे. या गंभीर तक्रारीनंतर पोलिसांनी धीरजविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस पथके संशयिताचा शोध घेत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button