भीम टेकडीवर बुद्ध जयंतीचा मोठा जागर
विश्वशांती रॅलीसह पाच दिवसांचा भव्य सोहळा

अमरावती/26एप्रिल: येथील भीम टेकडीवर 26 एप्रिल ते 1 मे 2026 या काळात बुद्ध जयंती महोत्सवाचा पाच दिवसांचा धम्मचक्राचा मोठा जागर होत आहे. यानिमित्ताने चित्रकला, रांगोळी, भीमगीत स्पर्धा आणि विचारवंतांचे परिसंवाद रंगणार असून 1 मे रोजी होणार्या विश्वशांती रॅलीने संपूर्ण शहर निळ्या रंगात न्हाऊन निघणार आहे.
बुद्ध जयंती उत्सव समिती अमरावती मागील 29 वर्षांपासून हा वारसा जोपासत आहे. महोत्सवाची सुरुवात 11 एप्रिलला झाली. 26 एप्रिलला स्पर्धा होतील, ज्याचे नियोजन रत्नाकर सिरसाट, अमोल तायडे, संगिता मेश्राम, रंजना गोवर्धन, त्रिवेणी मकेश्वर, अनिता मसाने, कल्पना घोडेस्वार, सविता गायकवाड,
कल्पना सिरसाट आणि प्रिया नागदिवे करत आहेत. 28 एप्रिलच्या
उद्घाटनास खा. बळवंत वानखडे, आशिष येरेकर, राकेश ओला, वर्षा लड्डा, सत्यम गांधी, विशाल आनंद, अनिल भटकर आणि गौतम वर्धन उपस्थित राहतील. या दिवशी वकील दिलीप एडतकर, वकील कीर्ती डोळे, भूपेंद्र गणवीर आणि राहुल गडपाले प्रबोधन करतील. 29 एप्रिलला स्वातीताई रवींद्र वैद्य, धम्मचारी अभिनवनीता, रजनीताई गुळदेकर, शामला कटके, पुष्पा रवींद्र मुंडे, विद्यासूची आणि ताराकेतु उपस्थित राहतील. 30 एप्रिलला प्रकाश मेश्राम यांचे नृत्य होईल, ज्याला मिलिंद देवरे, रवींद्र मुन्द्रे, राजेंद्र रामटेके, बुद्धभूषण सोनवणे, गोपीचंद मेश्राम आदि उपस्थित राहणार.




