दर्यापूरमध्ये श्री चक्रधर स्वामी जयंतीनिमित्त भव्य पालखी सोहळा

दर्यापूर /13 सप्टेंबर– महानुभाव पंथाचे जनक श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंती दिनानिमित्त दर्यापूर शहरात महानुभाव पंथाच्या भक्तांच्या वतीने भव्य-दिव्य पालखी मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण दर्यापूर शहरातून ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात पालखी मिरवणूक शहरातून काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने महानुभाव पंथाचे भक्त सहभागी झाले होते. भक्तिगीतांच्या तालावर भाविकांनी नृत्य करत आनंद व्यक्त केला. या पालखी सोहळ्यामध्ये अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी सहभाग घेत पालखीचे पूजन केले. तसेच नगराध्यक्ष मंदाकिनी सुधाकर भारसाकडे यांचीही पालखी सोहळ्यात उपस्थिती होती. दर्यापूर तालुक्यातील महानुभाव पंथाच्या भक्तांच्या सहकार्याने हा सोहळा उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडला. मिरवणुकीदरम्यान वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी दर्यापूर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Back to top button