अर्धा तास चर्चा; आता माघार नाही एकाच कारमधून प्रवास
शिंदे आणि अमित शाह यांच्या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई/13 सप्टेंबर ; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या दौर्यावर असून त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी पंतप्रधान मोदींचा वाढदिवस असलेल्या 17 सप्टेंबरपासून सुरू होणार्या ’सेवा संकल्प अभियाना’बद्दल माहिती दिली. या परिषदेच्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. मात्र त्यानंतर एका फोटोमुळे राजकीय वर्तुळात चर्चांचं वादळ उठलंय.
हा फोटो आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्या झालेल्या झालेल्या बैठकीचा. दोन्ही नेत्यांनी अर्धा तास बैठक चालली त्यानंतर ते दोघेही एका कार्यक्रमात जाण्यासाठी एकाच कारमध्ये गेले. त्यामुळे शिंदे आणि शहा यांच्यात काय खिचडी शिजतेय अशी वृत्तसंस्था/13 सप्टेंबर
मुंबईः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या दौर्यावर असून त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी पंतप्रधान मोदींचा वाढदिवस असलेल्या 17 सप्टेंबरपासून सुरू होणार्या ’सेवा संकल्प अभियाना’बद्दल माहिती दिली. या परिषदेच्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. मात्र त्यानंतर एका फोटोमुळे राजकीय वर्तुळात चर्चांचं वादळ उठलंय.
हा फोटो आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्या झालेल्या झालेल्या बैठकीचा. दोन्ही नेत्यांनी अर्धा तास बैठक चालली त्यानंतर ते दोघेही एका कार्यक्रमात जाण्यासाठी एकाच कारमध्ये गेले. त्यामुळे शिंदे आणि शहा यांच्यात काय खिचडी शिजतेय अशीचर्चा आता दबक्या आवाजात सुरूय.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीचा एक फोटोही समोर आलाय. यानंतर घडलेल्या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. त्याचं झालं असं, मुंबई दौर्यावर असलेले अमित शहा यांनी ’एशियाटिक सोसायटी’ला भेट देण्यापूर्वी ’सह्याद्री अतिथीगृहा’वर उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली.या दोन्ही नेत्यांची सुमारे अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर ते एकाच गाडीतून ’एशियाटिक सोसायटी’मधील कार्यक्रमाच्या ठिकाणी एकत्र पोहोचले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील थेट त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल झाले. यामुळे एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यात काही वेगळी खिचडी शिजतेय का? त्या दोघांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली याची माहिती बाहेर आली नाहीये, मात्र तर्कवितर्कांना उधाण आले आहे





