श्रीचक्रधर स्वामी अवतार दिनानिमित्त मनपात अभिवादन

अमरावती/13 सप्टेंबर : भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांच्या अवतार दिनानिमित्त रविवार, दि. 13 सप्टेंबर 2026 रोजी अमरावती महानगरपालिकेच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी 11 वाजता आयोजित या कार्यक्रमात मा. महापौर श्री. श्रीचंद तेजवानी यांच्या शुभहस्ते भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांच्या विचारांवर प्रबोधन करण्यात आले. तसेच त्यांनी समाजात रुजविलेली सामाजिक समता, अहिंसा आणि मानवतावादी विचारधारा याबाबत माहितीचे वाचन करण्यात आले. त्यांच्या कार्यातून समाजाला मिळालेला समतेचा आणि बंधुभावाचा संदेश यावेळी अधोरेखित करण्यात आला. कार्यक्रमास स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेते चेतन गावंडे, मध्य झोन सभापती स्वाती कुलकर्णी, नगरसेवक मनिष बजाज, ड. प्रशांत देशपांडे, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, प्रमोद मोहोड, भूषण खडेकार, अखिलेश खडेकार यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.





