वस्त्रोद्योगात अमरावतीच्या धाग्यांची गरुडझेप
बिझीलँडच्या पायावर उभा राहिला वस्त्रोद्योगाचा महामेरू

बजाज परिवाराकडून डव्ह उद्योग समूहाची देशभरात यशस्वी घोडदौड
अमरावती/9 नोव्हेंबर – स्व. भागचंदजी बजाज यांच्या दूरदृष्टीतून उभ्या राहिलेल्या बिझीलँड व्यापारी संकुलाच्या भक्कम पायावर डव्ह वस्त्रोद्योग समूहाने औद्योगिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली आहे. स्थानिक पातळीवरील घाऊक कापड व्यापारापासून सुरू झालेली ही वाटचाल आज देशभरात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारी ठरली असून, अमरावतीने वस्त्रोद्योग क्षेत्रात यशाची उंच भरारी घेतली आहे.
शेकडो छोट्या-मोठ्या दुकानदारांना हक्काचा रोजगार मिळवून देणार्या बिझीलँड संकुलाच्या यशानंतर बजाज कुटुंबीयांनी कापड निर्मितीच्या मुख्य प्रवाहात पाऊल टाकले. या संपूर्ण औद्योगिक उभारणीत सुभाष बजाज, सुनील बजाज यांचे मार्गदर्शन, भक्कम पाठबळ मोलाचे ठरले. या मजबूत कौटुंबिक साथीच्या बळावर रोहितराज बजाज, जयराज बजाज या नव्या पिढीने संपूर्ण उद्योगाचा कायापालट घडवून आणला. रोहितराज बजाज यांनी थेट ग्राहकांची नाडी ओळखून उत्पादनांची गुणवत्ता, योग्य भाव आणि विक्री व्यवस्था यावर भर दिला. दुसरीकडे जयराज बजाज यांनी उत्तम कच्चा माल मिळवणे, कुशल कामगारांची भक्कम फौज उभारणे आणि कारखान्यांमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री आणण्याची अवघड जबाबदारी लिलया पेलली.
ग्राहकांच्या पसंतीस उतरत या उद्योगाने लहान मुलांसह महिलांच्या रोजच्या वापरासाठी आरामदायक कपड्यांची मोठी बाजारपेठ काबीज केली. त्यानंतर काळाची पावले ओळखून 2022 मध्ये नव्या धाटणीच्या कपड्यांच्या निर्मितीची तयारी सुरू झाली, तर 2024 पासून प्रत्यक्ष उत्पादन सुरू करण्यात आले. महिला आणि पुरुषांसाठी रोजच्या वावरात अत्यंत हलके, टिकाऊ असणारे टी-शर्ट, ट्रॅकसूट, बर्मुडा, पायजमे, कॅपरी अशा विविधांगी कपड्यांनी अल्पावधीतच बाजारात स्वतःचा दबदबा निर्माण केला. अमरावती औद्योगिक वसाहतीमधील तब्बल 40 एकरांहून अधिक विस्तीर्ण पट्ट्यात हा कारखाना धडधडत आहे. शेकडो हातांना काम देत अमरावतीचे नाव थेट देशाच्या कानाकोपर्यात पोहोचवणारा हा प्रवास स्थानिक तरुणांसाठी नवा आदर्श ठरला आहे.
औद्योगिक क्रांतीचे नवे ऊर्जा केंद्र
अनेक राज्यांतील व्यापारी वितरकांच्या भक्कम जाळ्यामुळे हे ब्रँड घरोघरी पोहोचले. यंदाच्या दिवाळीनिमित्त उद्योग समूहाने सर्व ग्राहक, व्यावसायिक आणि हितचिंतकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.





