कर्करोगावरील 1,364 औषधांच्या सुधारित एमआरपी लागू
679 ब्रँड्सच्या किमतीत 50 टक्क्यांहून अधिक कपात

नवी दिल्ली/9 नोव्हेंबर : कर्करोगाच्या रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने कर्करोगविरोधी औषधांच्या कमाल किरकोळ किमतींवरील व्यापारी लाभांशाची मर्यादा निश्चित केली आहे. या निर्णयानुसार 1,364 औषध फॉर्म्युलेशन्सच्या सुधारित एमआरपी 9 नोव्हेंबर 2026 पासून लागू झाल्या आहेत. औषधांच्या किमतीत झालेल्या कपातीमुळे ग्राहकांची दरवर्षी अंदाजे 3,540.38 कोटींची बचत होण्याची अपेक्षा आहे.
रसायन आणि खते मंत्रालयाच्या औषधनिर्माण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या एनपीपीए ने हा निर्णय घेतला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्यसेवा महासंचालनालयाने 17 ऑक्टोबर 2026 रोजी स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीच्या शिफारशींच्या आधारे कर्करोगविरोधी 137 औषधांच्या एमआरपीवरील व्यापारी लाभांशाची मर्यादा निश्चित करण्यात आली. 8 नोव्हेंबर 2026 पर्यंत 85 औषधनिर्मिती कंपन्यांनी 121 औषधांशी संबंधित 1,364 कर्करोगविरोधी औषध फॉर्म्युलेशन्सच्या सुधारित एमआरपी जाहीर केल्या आहेत. यापैकी 679 ब्रँड्सच्या किमतीत 50 टक्क्यांहून अधिक कपात नोंदवण्यात आली आहे. औषधांच्या एमआरपीमध्ये सर्वाधिक 96.45 टक्क्यांची कपात झाली आहे.
कर्करोगाच्या उपचारांसाठी लागणार्या औषधांचा खर्च अनेक रुग्णांसाठी मोठे आर्थिक आव्हान असतो. औषधांच्या किमती कमी झाल्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे ग्राहकांची दरवर्षी अंदाजे 3,540.38 कोटींची बचत होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.ग्राहकांना औषधांच्या आवेष्टनावर छापलेली सुधारित एमआरपी तपासता येणार आहे. तसेच ‘झहरीार डरहळ ऊररा’ या मोबाइल पद्वारे किंवा छझझ- च्या अधिकृत संकेतस्थळावरून औषधांच्या किमतींची पडताळणी करता येईल





