युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी भारत सज्ज
पीएम नरेंद्र मोदींची झेलेंस्की यांच्याशी चर्चा

नवी दिल्ली/ 9 नोव्हेंबर :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी पंतप्रधान मोदींना सुरू असलेल्या संघर्षाबाबतच्या घडामोडींची माहिती दिली. या संवादादरम्यान, पंतप्रधान मोदींनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना सांगितले की, सुरू असलेल्या संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढण्याच्या दिशेने केल्या जाणार्या सर्व प्रयत्नांमध्ये योगदान देण्यासाठी भारत सज्ज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. या संभाषणामध्ये दोन्ही नेत्यांनी रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या परिस्थितीवर आणि भारत-युक्रेन द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या उपायांवर सविस्तर चर्चा केली.या संवादानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ’एक्स’ वर पोस्ट केली की, अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी अतिशय फलदायी चर्चा झाली. आम्ही आमच्या द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला असून भारत-युक्रेन संबंध अधिक मजबूत करण्यावर आमचे एकमत झाले आहे.