राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची तारीखही ठरली होती?

गोविंदबागेतील बैठकीचा युगेंद्र पवारांकडून खुलासा

मुंबई/9 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत पुन्हा एकदा राजकीय चर्चांना वेग आला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांनी विलिनीकरणाबाबत महत्त्वाचा दावा केला आहे. अजित पवार यांची यासंदर्भात बैठक झाली होती. गोविंदबागेतही बैठक पार पडली होती आणि 12 फेब्रुवारी रोजी अजितदादा स्वतः विलिनीकरणाची घोषणा करणार होते, असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे.
‘विलिनीकरण होणारच होतं, दादांची ती इच्छा होती’
युगेंद्र पवार म्हणाले की, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू होती. अजित पवार यांची याबाबत बैठक झाली होती. गोविंदबागेतही बैठक झाली, त्यावेळी पत्रकारही उपस्थित होते. सर्व काही ठरलं होतं आणि साधारण 12 फेब्रुवारीला अजितदादा स्वतः विलिनीकरणाची घोषणा करणार होते, असा दावा त्यांनी केला. मात्र, अजित पवार यांच्या अचानक निधनामुळे हा विषय मागे पडला. शरद पवार यांच्यासोबत पुन्हा एकत्र येण्याची अजित पवार यांची इच्छा होती, असंही युगेंद्र पवार यांनी सांगितलं.

Back to top button