राधानगरातील गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टमध्ये ईद मिलन सोहळा
सामाजिक संघटनांचा उपक्रम

अमरावती/24 मार्च –सबके लिए खुला है मंदिर यह हमारा या राष्ट्रसंतांच्या उदात्त विचारांचा जागर करत राधानगरातील गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टमध्ये ईद मिलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. विविध सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने आयोजित या सोहळ्यात हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत माणुसकी आणि भारतीय संविधानातील समता व बंधुतेच्या मूल्यांचा प्रत्यय दिला. राष्ट्रीय एकात्मता आणि सलोख्याचा संदेश देणार्या या कार्यक्रमाने संपूर्ण परिसर भारावून गेला होता. या सोहळ्याचे आयोजन गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, संविधान जागर अभियान आणि जमात-ए-इस्लामी हिंद यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सतीश तराळ होते, तर गाडगेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दिलीप काळे उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील स्फूर्तीगीताने उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ जाधव यांचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला. भारत हा विविधतेने नटलेला देश असून माणुसकी हाच सर्व धर्मांचा गाभा आहे, असे प्रतिपादन मान्यवरांनी आपल्या भाषणातून केले. सामाजिक सलोखा आणि परस्पर विश्वास वाढवण्यासाठी अशा कार्यक्रमांची आज मोठी गरज असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. कार्यक्रमात संविधान जागर प्रदर्शनीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी मेहराब खान, अनिल काझी, नजमा काझी, ज्योती राठोड, मिर्झा गफ्फार बेग, रफीक अहमद, याह्या खान पठाण, राजीव बसवनाथे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय डवरे यांनी केले, सूत्रसंचालन प्रफुल्ल मंदा श्रीधर यांनी तर आभार प्रदर्शन रवींद्र फुले यांनी केले. प्रीतम जौनपुरी आणि नीलिमा भोजने यांनी कविता सादर केल्या. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी मो. अफसर भाई, श्रीधरराव डहाके, शंकरराव वसू, रामदासजी सदार, बाळासाहेब महल्ले, महेश देशमुख, शिरीन खान, पल्लवी ढोले, सुनीता रामटेके, नरेंद्र धर्माळे, सुभाष गौरखेडे, गणेश गहूकर, दिलीप लाडे, आशिष देशमुख, दिगंबर मेश्राम, संदीप यादव, पुंडलिक गोसावी, सचिन खोब्रागडे, सनी चव्हाण, प्रवीण वासनिक, शुभम दमाहे, मंजू वासनिक, वर्षा गावंडे, सरिता लाडे, विजया घोडेश्वर, हर्षा सगुणे, विजया करोले, तन्वी, अनुजा भगत, साबीर अली, रहमान शहा, दिलबर शहा, वसीम राज, वेदांत कोल्हे, सतीश पठाडे, पुरुषोत्तम दास बागडी, सतीश प्रेमलवार, अशोक वाटाणे, दिनेश वानखडे, अभिषेक खडके, नितीन गायकी आदि उपस्थित होते.




