बार कौन्सिलसाठी वकिलांचे मतदान

अमरावती – महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीसाठी आज अमरावती जिल्हा न्यायालयात स्थापन केलेल्या केंद्रावर वकिलांनी उत्स्फूर्त मतदान केले. माजी मंत्री ड. यशोमती ठाकूर, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. सुनील देशमुख आणि इतर मान्यवर पदाधिकार्‍यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरत असल्याने सकाळपासूनच वकिलांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. बार कौन्सिलच्या या निवडणुकीकडे संपूर्ण विधी क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button