महानगरपालिकेच्या 13 शहरी आरोग्य केंद्रांत लसीकरण मोहीम

आरोग्य केंद्र विलास नगर येथे प्रारंभ

अमरावती 24 मार्च : 23 मार्च 2026 लसीकरण दिनाचे औचित्य साधून अमरावती महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने शहरात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला रोखण्यासाठी अमरावती महानगरपालिकेच्या एकूण 13 शहरी आरोग्य केंद्रांमध्ये व्यापक कझत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून आज शहरी आरोग्य केंद्र विलास नगर येथे या विशेष लसीकरण सत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन अमरावती महानगरपालिकेचे माननीय महापौर श्रीचंद तेजवानी सर तसेच नगरसेवक संजय नरवणे, समाजसेवक कौशिक अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. मुलींचे आरोग्य हेच खर्‍या अर्थाने घराचे आरोग्य असते. भविष्यातील गंभीर आजारांपासून आपल्या लेकींना सुरक्षित ठेवण्यासाठी ’कझत’ लस हे एक प्रभावी सुरक्षा कवच आहे. पालकांनी जागरूक राहून आपल्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे. कर्करोगासारख्या आजाराला प्रतिबंध घालणे आता विज्ञानामुळे शक्य झाले आहे. अमरावतीच्या 13 केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध असून, सुजाण पालकांनी 14 वर्ष पूर्ण आणि 15 वर्ष पूर्ण न केलेल्या वयोगटातील आपल्या मुलींना ही लस टोचून देऊन त्यांना निरोगी आयुष्याची भेट द्यावी.अमरावती महानगरपालिकेच्या 13 शहरी आरोग्य केंद्रांत ‘कझत’ लसीकरण मोहिमेचा; शहरी आरोग्य केंद्र विलास नगर येथे उत्साहात शुभारंभ. कर्करोगमुक्त भविष्यासाठी ही लस मुलींना देणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

संबंधित बातम्या

Back to top button