कंत्राटी कर्मचारी बडतर्फ, केंद्रप्रमुख निलंबित
आरटीई प्रवेशात लाच घेणारा भातकुली पंचायत समितीचा

सीईओ सत्यम गांधी यांची धडक कारवाई
आपली मातृभूमिने भ्रष्टाचाराचे काढले होते वाभाडे
अमरावती/22 मे – आरटीई अंतर्गत शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागणार्या भातकुली पंचायत समितीचे प्रभारी केंद्रप्रमुख नरेंद्र धनस्कर यांना निलंबित करण्यात आले असून, कंत्राटी कर्मचारी हर्षवर्धन इंगळे याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी 21 मे रोजी ही धडक कारवाई केली आहे.
या प्रकरणातील सूत्रधार हर्षवर्धन इंगळे आणि नरेंद्र धनस्कर यांना 9 मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. तक्रारदाराच्या मुलीला आरटीई प्रवेशाद्वारे एका प्राथमिक शाळेत प्रवेश मिळाला होता. या प्रवेशासाठी पत्त्याची पडताळणी करण्याच्या नावाखाली हे दोघेही तक्रारदाराच्या घरी गेले होते. मात्र, पत्ता चुकीचा असल्याचे सांगून मुलीचा प्रवेश होऊ शकत नाही अशी भीती त्यांनी पालकांना दाखवली होती. या प्रकरणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी हर्षवर्धन इंगळे याला सेवेतून बडतर्फ केले असून, प्रभारी केंद्रप्रमुख नरेंद्र धनस्कर यांना निलंबित केले आहे. या कठोर कारवाईमुळे शिक्षण विभागातील भ्रष्ट प्रवृत्तींना मोठा चाप बसला आहे. गरीब व आर्थिक दुर्बल घटकांना न्याय देण्यासाठी आरटीई कायदा अस्तित्वात आला. खाजगी शाळांमध्ये कोणतेही शुल्क न घेता प्रवेश देण्याची योजना सरकारने आणली. पालकांनी या योजनेचा फायदा घेत आपल्या पाल्यांचे प्रवेश शाळांमध्ये करण्यासाठी केलेल्या प्रक्रियेत पंचायत समिती स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांनी केवळ तपासणी करायची असते असे असतांना भातकुली पंचायत समितीचे प्रभारी केंद्रप्रमुख नरेंद्र धनस्कर व कंत्राटी कर्मचारी हर्षवर्धन इंगळे यांनी मात्र पालकालाच 50 हजारा चीलाच मागितली. हे प्रकरण दबण्याची शक्यता व्यक्त केल्या जात होती तेव्हा आपली मातृभूमिने अग्रलेख लिहून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या निदर्शनास सर्व बाजु आणून दिल्या होत्या. परीणामी भातकुली पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांनाही सीईओ यांनी नोटीस दिल्याचे सांगण्यात येत आहे. सीईओंनी थेट कारवाई करत कंत्राटी कर्मचारी बडतर्फ केला तर केंद्रप्रमुखाला निलंबित केले. या घटनेने लाचखोर अधिकार्यांमध्ये दहशत निर्माण होईल. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान
सदस्यांचा कार्यकाळ 21 जून ते 19 जुलै या कालावधीत वेगवेगळ्या तारखांना संपणार असल्यामुळे निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर केले आहे.राज्यस्तरीय अहवाल राज्यसभा निवडणुकीसाठी 1 जून रोजी अधिसूचना जारी केली जाईल. इच्छुक उमेदवारांना 8 जूनपर्यंत अर्ज (नामांकन) दाखल करता येणार आहेत. त्यानंतर छाननी प्रक्रिया पूर्ण होईल आणि 18 जूनला मतदान व निकाल जाहीर केला जाईल.या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे, कारण गुजरातपासून राजस्थानपर्यंत अनेक राज्यांमध्ये राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीमुळेही राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




