अंजनगाव बारी परिसरात बैलपोळ्याचा जल्लोष
सजलेल्या बैलजोड्या अन् वाजतगाजत मिरवणुका

पार्डी देवीत बैलजोडी मालकांचा सन्मान
अंजनगाव बारी/11 सप्टेंबर : अंजनगाव बारीसह परिसरातील विविध गावांमध्ये बैलपोळा उत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. अंजनगाव बारी येथे बँडच्या तालावर वाजतगाजत 90 बैलजोड्यांची मिरवणूक काढण्यात आली. ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत उत्सव शांततेत पार पडला. नागरिक व शेतकर्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
पार्डी (देवी) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने बैलजोडी मालकांना दुपट्टा देऊन सन्मानित करण्यात आले. गावातून दिंडी काढून महादेव व हनुमान मंदिरात पूजन करण्यात आले. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने बैलपोळा फोडण्यात आला. यावेळी सरपंच अक्षय मेश्राम, उपसरपंच प्रतिभा बनसोड, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक व शेतकरी उपस्थित होते.
वडगाव जिरे येथे ग्रामपंचायत प्रशासनाच्या नियोजनात बैलपोळा उत्साहात पार पडला. नागरिक व शेतकर्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत उत्सवाचा आनंद लुटला.





