बौद्ध धम्माचा मानवतावादी विचार घरोघरी पोहोचवणार
दाभा येथे समता सैनिक शिबिराचे उद्घाटन

अमरावती/17 मे: समाजातील शोषित आणि वंचित घटकांच्या हक्कासाठी लढणारे सैनिक घडवून बुद्ध धम्माचे मानवतावादी विचार घरोघरी पोहोचवणे हाच समता सैनिक दलाचा मुख्य उद्देश आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा येथे तथागत गौतम बुद्ध जयंती आणि त्यागमूर्ती माता रमाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त दोन दिवसीय शिबिराचे उत्साहात उद्घाटन झाले. हा केवळ उपक्रम नसून सामाजिक परिवर्तनाची मोठी चळवळ असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम वंजारी यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा संघटक संजय घडीकर होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रचार व पर्यटन सचिव नयन मोंढे, जिल्हा संघटक पद्माकर मांडवधरे, तालुकाध्यक्ष मदन खंडारे, अकोला येथील प्रशिक्षक मुख्य सेनापती गणेश दंडी, महिला प्रमुख रंजना गायकवाड आणि रामदास हाडे उपस्थित होते. याप्रसंगी युवकांनी सामाजिक बांधिलकी जोपासून संघटितपणे कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका सरचिटणीस सतीश गोपनारायण यांनी केले. शिबिराच्या यशासाठी रंजना गायकवाड, अन्नपूर्णा घोडेश्वर, शीला धनगर, सुनंदा उज्वला मोहोळ, पद्मा खळसे, प्रतिमा ढोके, मैना गोलमाने, इंदिरा वाढवले, दुर्गा वाघमारे, वंदना तेलमोरे, पद्मावती राजकन्या शृंगारे, रूपाली तंबाके, कोमल तायडे, माया बोरकर, अर्चना सुपनेर, मनीषा काळे, जया खंडारे, राधा तायडे, रंजना धनगर, अक्षर कोटांगळे, अनन्या सुपनेर, अजय पाटील, अभिनव अगम, यश टेंभुर्णी, दीपक खडसे, रमेश देवरे, सिद्धार्थ कीर्तन मोहोळ, संतोष कोकाटे, रितिका कापसे, ऋतुजा गजभिये, चंदा गजभिये, समृद्धी पंढरपूर बागडे, नम्रता शिंगारे, गीता शिंगारे, दादाराव वानखडे, जयेंद्र थोरात, मुकुंद मेश्राम, विलास बागडे, सुमित मोहोळ यांनी परिश्रम घेतले.




