कपिलवस्तू नगरात युवकाची निर्घृण हत्या
गाडगे नगर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न

सहा आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात
शहरात गुन्हेगारांचे वाढलेले धाडसी कृत्य
अमरावती /12 एप्रिल– शहरात गुन्हेगारांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 20 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. संतोष उर्फ संत्या राजू बन असे मृत तरुणाचे नाव असून, जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी 5 ते 7 जणांच्या टोळीने मध्यरात्रीच्या सुमारास हा थरार घडवून आणला. धक्कादायक बाब म्हणजे, सहा महिन्यां पूर्वीच संत्यावर जीवघेणा हल्ला झाला होता, मात्र त्यावेळी पोलिसांनी केलेल्या सैल कारवाईमुळेच आरोपींचे धाडस वाढले आणि संत्याला आपला जीव गमवावा लागला, असा संतप्त आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कपिलवस्तू नगर येथील रहिवासी असलेला संतोष बन हा शनिवारी रात्री उशिरा आपल्या घरासमोरील ओट्यावर बसलेला होता. दरम्यान, रात्री 12 च्या सुमारास जुन्या वादाचे निमित्त साधून साहिल मावस्कर हा आपल्या पाच ते सहा अल्पवयीन सहकार्यांसह पांढर्या रंगाच्या मोपेड दुचाकीने तेथे पोहोचला. आरोपींना पाहून संतोषने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळ काढला, मात्र आरोपींनी त्याचा पाठलाग केला. लक्ष्मी नगर ते प्रवीण नगराच्या मध्यभागी असलेल्या एका दळण चक्की केंद्राजवळ आरोपींनी संतोषला गाठले आणि त्याच्यावर धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संतोषचा आक्रोश ऐकून त्याचे मित्र आणि नातेवाईक घटनास्थळी धावले. त्यांनी त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश शिंदे आणि ठाणेदार गोरखनाथ जाधव यांनी ताफ्यासह धाव घेतली. पोलिसांच्या तपासात स्थानिक नागरिकांनी आरोपींची दुचाकी पकडून दिली, ज्याच्या आधारे शहर गुन्हे शाखा आणि गाडगे नगर पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवून मुख्य आरोपी साहिल मावस्करसह सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मृत संतोषच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की, सहा महिन्यांपूर्वी जेव्हा संतोषवर सहा वार झाले होते, तेव्हा पोलिसांनी चिरीमिरी घेऊन प्रकरणाकडे दुर्लक्ष केले होते. जर त्यावेळी ठोस कारवाई झाली असती, तर आज संतोष जिवंत असता. शहरात दिवसाआड घडणार्या या खुनाच्या सत्रामुळे पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक उरला नाही का, असा प्रश्न आता सर्वसामान्य जनता विचारत आहे.
खाकीवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप-सहा महिन्यांपूर्वी संतोषवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या वेळी गाडगे नगर पोलिसांनी केवळ थातूर-मातूरऐकून त्याचे मित्र आणि नातेवाईक घटनास्थळी धावले. त्यांनी त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश शिंदे आणि ठाणेदार गोरखनाथ जाधव यांनी ताफ्यासह धाव घेतली. पोलिसांच्या तपासात स्थानिक नागरिकांनी आरोपींची दुचाकी पकडून दिली, ज्याच्या आधारे शहर गुन्हे शाखा आणि गाडगे नगर पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवून मुख्य आरोपी साहिल मावस्करसह सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मृत संतोषच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की, सहा महिन्यांपूर्वी जेव्हा संतोषवर सहा वार झाले होते, तेव्हा पोलिसांनी चिरीमिरी घेऊन प्रकरणाकडे दुर्लक्ष केले होते. जर त्यावेळी ठोस कारवाई झाली असती, तर आज संतोष जिवंत असता. शहरात दिवसाआड घडणार्या या खुनाच्या सत्रामुळे पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक उरला नाही का, असा प्रश्न आता सर्वसामान्य जनता विचारत आहे.
खाकीवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप-सहा महिन्यांपूर्वी संतोषवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या वेळी गाडगे नगर पोलिसांनी केवळ थातूर-मातूर कारवाई केली होती. पोलिसांनी चिरीमिरी घेऊन प्रकरण दाबल्यामुळे आरोपींचे मनोबल वाढले, असा खळबळजनक आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला असून यामुळे पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे.