तांत्रिक शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास

केवळ पदवी नको; व्यक्तिमत्त्वही घडवा

प्राचार्य डॉ. सागर झोरामपुरे यांचे प्रतिपादन

अमरावती/10 एप्रिल: तांत्रिक शिक्षण हे केवळ पदवी मिळवण्यापुरते मर्यादित नसून ते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे एक भक्कम साधन आहे, असे ठाम प्रतिपादन डॉ. राजेंद्र गोडे तांत्रिक व संशोधन संस्थेचे प्राचार्य डॉ. सागर सी. झोरामपुरे यांनी केले.
शहरातील डॉ. राजेंद्र गोडे तांत्रिक व संशोधन संस्थेत 30 मार्च रोजी ’ट्राय टेक कार्निव्हल’ या भव्य तांत्रिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष योगेंद्रजी गोडे आणि सचिव कु. तन्वी गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा उत्साहात पार पडला. महोत्सवाचे उद्घाटन सरस्वती माता आणि संस्थापक अध्यक्ष स्व. डॉ. राजेंद्रजी गोडे यांच्या प्रतिमा पूजनाने झाले. आजच्या धावपळीच्या युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृती आणि नवनवीन प्रयोगातून स्वतःची क्षमता सिद्ध करावी, असे मत यावेळी विभाग प्रमुख प्रा. कांचन पिंगळे यांनी मांडले. महोत्सवात विद्यार्थ्यांनी बनवलेले विविध प्रकल्प, भित्तीपत्रके आणि ऑनलाइन खेळांच्या स्पर्धांना मोठा प्रतिसाद मिळाला. डॉ. सागर झोरामपुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, केवळ तांत्रिक ज्ञानावर अवलंबून न राहता संवाद कौशल्य, सांघिक काम करण्याची वृत्ती आणि नेतृत्वगुण जोपासणे काळाची गरज आहे. अशा महोत्सवातून विद्यार्थ्यांना आपले सुप्त गुण दाखवण्याची मोठी संधी मिळते. या कार्यक्रमाला डीन डॉ. एच. आर. धनभर, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. मिनल बायस्कर आणि तंत्रनिकेतनच्या समन्वयक प्रा. दिपाली देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. या महोत्सवाच्या यशासाठी प्रा. आर. आर. सोळंके, प्रा. सोनाली पवार, प्रा. जयश्री डोंगरे, प्रा. बी. एस. मेत्रे, डॉ. मनोज खेरे, प्रा. डी. जी. इंगळे आणि प्रा. आर. एम. सोळंके यांनी विशेष परिश्रम घेतले.

संबंधित बातम्या

Back to top button