नताशा आव्हाड यांना शिवानी वडेट्टीवार यांचा पाठिंबा
भाजपविरोधात जेन-झी रस्त्यावर उतरणार

नागपूर /16 नोव्हेंबर : काँग्रेसमधील अंतर्गत राजकीय घडामोडी आणि मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशनच्या मुद्द्या वरून राजकीय वाता वरण तापले असताना, युवक काँग्रेसच्या पदाधिकारी शिवानी वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा आव्हाड यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला आहे.
पक्षाची विचारधारा आणि संविधान यांचा विचार करूनच आपण नताशा यांच्या भूमिकेला समर्थन दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डिलिमिटेशनच्या माध्यमातून संविधानविरोधी निर्णय घेतले जात असतील, तर त्याला कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा देता येणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली





