अग्रवाल समाजाच्या अन्नकूट प्रसादाचा 3 हजार जणांना लाभ

सत्यनारायण मंदिरात भव्य अन्नकूट सोहळा

 दिवाळी मिलन कार्यक्रमातून समाजबांधवांना शुभेच्छा

अमरावती /16 नोव्हेंबर– दिवाळीनंतर येणार्‍या पहिल्या रविवारी आयोजित अन्नकूट सोहळ्यात अग्रवाल समाजाच्या वतीने सुमारे 3 हजार समाजबांधवांसह इतर समाजातील नागरिकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली. यंदा विशेष म्हणजे प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकणार्‍या नागरिकांसाठी डब्यांचीही व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे सुमारे 3 हजार जणांना अन्नकूट प्रसादाचा लाभ घेता आला. स्थानिक धनराज लेन परिसरातील सत्यनारायण मंदिरात रविवारी सायंकाळी 6 वाजता हा धार्मिक सोहळा उत्साहात पार पडला. भगवान सत्यनारायणाची महाआरती, अन्नकूट प्रसादाचे वाटप आणि दिवाळी मिलन कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील एकोपा आणि सेवाभावाचे दर्शन घडले.
अन्नकूट प्रसादाची परंपरा दिवाळीनंतर पहिल्या रविवारी विविध समाजांच्या वतीने जपली जाते. याच परंपरेनुसार यंदाही अग्रवाल समाजाने सत्यनारायण मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भगवान सत्यनारायणाच्या पूजेसाठी तयार करण्यात आलेल्या 56 भोगांच्या प्रसादाला अन्नकूट प्रसादी असेही म्हटले जाते. या प्रसादाचा लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळावा, या उद्देशाने नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान सत्यनारायणाची विधिवत पूजा आणि महाआरती करण्यात आली. यावेळी सत्यनारायण देवस्थानचे अध्यक्ष राधेश्याम हनुमानप्रसादजी अग्रवाल, सचिव किशोर घिसूलालजी गोयनका, सदस्य राजकुमार छगनलालजी चुडिवाला, शशिकांत मधुसूदनजी झुनझुनवाला, किशोर रतनलालजी केडिया, अमरावती मंडळाचे संपादक तथा नगरसेवक अनिल अग्रवाल, अग्रवाल समाजाचे अध्यक्ष विजय केडिया, सचिव अजय चौधरी यांच्यासह समाजातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाआरतीनंतर सर्वांसाठी अन्नकूट प्रसादाचे वाटप सुरू करण्यात आले. यंदाच्या कार्यक्रमात केवळ अग्रवाल समाजापुरती मर्यादा न ठेवता अन्य समाजातील नागरिकांनाही प्रसादाचा लाभ घेता यावा, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसलेल्या नागरिकांनाही प्रसाद मिळावा, यासाठी सुमारे 3 हजार डब्यांचे वाटप करण्याची व्यवस्था करण्यात आली. ही सोय प्रथमच मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. या संपूर्ण व्यवस्थेचे नियोजन आणि अंमलबजावणी सुरळीत व्हावी, यासाठी सचिन मित्तल, अमित ककरानिया, अमित तालपत्री, लालू अग्रवाल, दीपक अग्रवाल, रवींद्र अग्रवाल, भारत चिरानिया यांच्यासह दीपक धामोरी यांनी विशेष मेहनत घेतली. प्रत्येक कुटुंबापर्यंत प्रसादाचे डबे पोहोचावेत, यासाठी त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम केले.
यावेळी अग्रवाल समाजाचे अध्यक्ष विजय शिव केडिया, उपाध्यक्ष संजय गुणवंती अग्रवाल, सचिव अजय बंसीलाल चौधरी, कोषाध्यक्ष संजय पुरुषोत्तम झुनझुनवाला, कार्यकारी कोषाध्यक्ष अनिल सतीश मित्तल, सहसचिव संजय अशोक अग्रवाल, कार्यकारिणी सदस्य मोहनलाल नागरमल अग्रवाल, सतीश आत्माराम राजपुरिया, विनोद गोपाल सरकारवाला, सतीश घिसूलाल गोयनका, संतोष रामनिवास अग्रवाल, विजय बालकिशन अग्रवाल, नरेंद्र शंकर छांवछरिया, अवध वेंकट अग्रवाल, प्रवीण त्र्यंबक अग्रवाल, मनीष विजय अग्रवाल, मोहन हनुमान अग्रवाल, मनीष केडिया, विजय रोशनलाल अग्रवाल, राजेश मोहनलाल अग्रवाल, सचिन हनुमान मित्तल, भरत एस. चिरानिया, सुनील मदन अग्रवाल, कैलास मोहन ककरानिया, अनिल राम श्रावगी, सुनील माधव केडिया, अशोक श्याम नांगलिया, सुनील नारायण अग्रवाल, सुनील दामोदर सलामपुरिया, मनीष माधव जालान, प्रवीण सुनील अग्रवाल, चेतन रमेश अग्रवाल, डॉ. अनिल राम सराफ, अमित अशोक अग्रवाल, अनिल प्रमोद अग्रवाल, किशोर घिसूलाल गोयनका, रमेश नारायण केडिया, गजेंद्र शिव केडिया, कैलास मोहन अग्रवाल, कैलास राम केडिया, दीपक प्रमोद अग्रवाल, डॉ. रवि खेतान, कपिल सतीश अग्रवाल, कौशिक शिव अग्रवाल, कन्हैयालाल राम मित्तल, यश सुनील नांगलिया, कुणाल सतीश अग्रवाल, अनुप अग्रवाल, शुभम संजय अग्रवाल, मधुसूदन सुनील अग्रवाल, आयुष हनुमान अग्रवाल, स्वप्निल सुनील अग्रवाल, अमित सुनील अग्रवाल, विक्की नरेंद्र अग्रवाल, शुभम गोपाल अग्रवाल, मयूर अग्रवाल, रोहित मुकेश अग्रवाल, आशीष अग्रवाल, नीलेश राम अग्रवाल, अमित मोहन अग्रवाल, मोहित प्रमोद अग्रवाल, राजेश माधोगढिया, दर्शन अग्रवाल, प्रतीक चुडिवाला, निखिल अग्रवाल, अनुराग प्रमोद अग्रवाल, देवेश विजय अग्रवाल, हर्षल अग्रवाल, राहुल अग्रवाल, शुभम अग्रवाल, वरुण अग्रवाल, हरीश केसान, हर्ष अग्रवाल, सागर केडिया, आदित्य अग्रवाल, कृष्णा अग्रवाल, समीर अग्रवाल, योगेश अग्रवाल, प्रतीक अग्रवाल, मोहन सिंघानिया, प्रखर अग्रवाल, अनिल मित्तल, संतोष अग्रवाल, संजय नांगलिया, संजय अग्रवाल, मनीष धामोरिकर, श्वेता केडिया, चंचल जालान, भारती अग्रवाल, सीमा अग्रवाल, रश्मी अग्रवाल, कविता चौधरी, अनुश्री लोया, स्मिता केडिया, रमा नांगलिया, साची नांगलिया, पायल केडिया, दीपाळी केडिया, श्रद्धा चौधरी, नितिशा केडिया, पारुल अग्रवाल, स्वाती केडिया, दीपा अग्रवाल, शीतल अग्रवाल, रिदिमा लोहिया, विशाखा अग्रवाल, करुणा केडिया, कविता अग्रवाल, ज्योती अग्रवाल, पूनम अग्रवाल, रुची ककरानिया, शिल्पा अग्रवाल, आरती केडिया, कोमल अग्रवाल, अरुणा अग्रवाल, समता केडिया, डॉ. माधुरी छांवछरिया, नेहा चौधरी, प्रीती सराफ, सरिता गोयनका, राजश्री अग्रवाल, मीना केडिया, मंजू धामोरिया, मनीषा अग्रवाल, संध्या चुडिवाला, सीमा दलाल, प्रतिती अग्रवाल, डॉ. कृष्णा सिंघानिया, मीनाक्षी केडिया, कमलेश केडिया, मीरा केडिया, कांता अग्रवाल, कुसुम अग्रवाल, सरिता केडिया, विनिता गोयनका, सुनीता अग्रवाल, अर्पणा अग्रवाल, किरण गोयनका, मंजू ककरानिया, रेखा सिंघानिया, पिंकी धामोरिया, सुनीता गोयल, उर्मिला नरेडी, सीमा माधोगढिया, पूजा गोयनका, आशा भगोरिया, सुधा खेतान, गायत्री बगडिया, हेमलता नरेडी, रमा केडिया, रक्षा अग्रवाल, अनिता अग्रवाल, सावित्री जालान, मंजू चुडिवाला, राजेंद्र अग्रवाल, वीरेंद्र गणेडीवाल, गिरीश जालान, कैलास ककरानिया, सुशीला चौधरी, अशोककुमार अग्रवाल, राजकुमार चुडिवाला, दीपक अग्रवाल, गजेंद्र केडिया, डॉ. सतीश अग्रवाल, संजय अग्रवाल, राजेश अग्रवाल, भरत अग्रवाल, श्रीराम नांगलिया, शशिकांत झुनझुनवाला, राजेंद्र केडिया, अनिल मित्तल, संकेत गोयनका, हनुमान अग्रवाल, मनीष अग्रवाल, पवन चुडिवाला, सुनील अग्रवाल, प्रशांत अग्रवाल, संजय नांगलिया, कैलास केडिया, संजय झुनझुनवाला, कैलास अग्रवाल आणि संजय अग्रवाल यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते.

तीन हजार नागरिकांपर्यंत प्रसाद

अग्रवाल समाजाच्या या उपक्रमातून धार्मिक परंपरेसोबत सामाजिक बांधिलकीही जपण्यात आली. सुमारे 3 हजार नागरिकांसाठी अन्नकूट प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे प्रत्यक्ष मंदिरात येऊ न शकणार्‍यांसाठीही प्रसादाचे डबे उपलब्ध करून देण्यात आले. अन्य समाजातील नागरिकांनाही या उपक्रमात सहभागी करून घेतल्याने कार्यक्रमाला व्यापक स्वरूप मिळाले. नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे प्रसाद वाटप सुरळीत पार पडले आणि समाजातील एकोपा अधिक मजबूत झाला.

Back to top button