दादा आपल्यात नाहीत यावर विश्वासच बसत नाही

अजित पवार यांच्या अर्धपुतळ्याचे अमित शाह यांच्या हस्ते पुण्यात अनावरण

अमित शहांकडून आठवणींना उजाळा
पुतळा लोकार्पणावेळी सुनेत्रा पवार भाऊक

पुणे /16 नोव्हेंबर : देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या पुणे दौर्‍यावर असून सोमवारी (16 नोव्हेंबर) त्यांच्याच हस्ते पुण्यातील जिल्हा परिषदेत दिवंगत अजित पवारांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण केले. पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारालाही दिवंगत अजित दादांचे नाव देण्यात आले. यानंतर पुण्यातील नेहरू मेमोरियल हॉलमध्ये झालेल्या भाषणादरम्यान केंद्रीय मंत्री अमित शहांनी अजित पवारांबद्दल एक किस्सा सांगितला. तसेच, अजित दादांच्या कामाचे कौतुक करत त्यांच्या अचानक जाण्याने मोठा धक्का बसल्याचेही त्यांनी सांगितले. भाषणादरम्यान मंत्री अमित शहा म्हणाले की, अजितदादांनी निर्णय घेतला की, ते महायुतीमध्ये सहभागी होणार आहेत. त्यावेळेस मला आश्चर्य वाटले होते. मी त्यावेळेस त्यांना विचारलेही होते की, दादा तुमची एक पार्श्वभूमी आहे. तुमच्या निर्णयाने जनतेलाही झटका बसेल. सत्ता येत जात राहील, पण हा निर्णय तुम्ही का घेत आहात? तेव्हा त्यांनी मला सांगितले की, अमित भाई प्रत्येकाचा एक कालखंड असतो. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशाचा विकास आणि महायुती दोघांना वेगळे नाही करू शकत. मला महाराष्ट्र आणि देशाच्या विकासासोबत यायचे आहे. म्हणून मला महायुतीचा सदस्य बनायचे आहे. मला माहिती आहे की थोडा उशीर झाला पण मला या महायुतीचा सदस्य बनायचे आहे, असे म्हणत अमित शहांनी अजित पवारांसोबतच्या महायुतीमध्ये सहभागी होण्याआधीचा किस्सा सर्वांना सांगितला.
भाषणादरम्यान मंत्री अमित शहा म्हणाले की, अजितदादांनी निर्णय घेतला की, ते महायुतीमध्ये सहभागी होणार आहेत. त्यावेळेस मला आश्चर्य वाटले होते. मी त्यावेळेस त्यांना विचारलेही होते की, दादा तुमची एक पार्श्वभूमी आहे. तुमच्या निर्णयाने जनतेलाही झटका बसेल. सत्ता येत जात राहील, पण हा निर्णय तुम्ही का घेत आहात? तेव्हा त्यांनी मला सांगितले की, अमित भाई प्रत्येकाचा एक कालखंड असतो. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशाचा विकास आणि महायुती दोघांना वेगळे नाही करू शकत. मला महाराष्ट्र आणि देशाच्या विकासासोबत यायचे आहे. म्हणून मला महायुतीचा सदस्य बनायचे आहे. मला माहिती आहे की थोडा उशीर झाला पण मला या महायुतीचा सदस्य बनायचे आहे, असे म्हणत अमित शहांनी अजित पवारांसोबतच्या महायुतीमध्ये सहभागी होण्याआधीचा किस्सा सर्वांना सांगितला.अजितदादांचे अशा पद्धतीने अचानक जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे. मला असे नाही वाटत की पुढील 3-4 दशकांपर्यंत ही पोकळी कोणी भरून काढेल. हे मोठे नुकसान आहे, जे कधीच भरून निघणार नाही. ते माझे मित्र होते. विकासाचा दृष्टिकोन त्यांच्याकडे होता, सहकार क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल किंवा आधुनिक क्षेत्रातही त्यांचा विशेष दृष्टिकोन होता. आज देखील विश्वास होत नाही की अजितदादा आपल्यात नाहीत. डोळे बंद केले तरी त्यांची प्रतिमा दिसते. असे म्हणत अमित शहांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अजितदादा नेहमी स्पष्ट बोलायचे. त्यांचे उत्तर नेहमी ‘हो’ किंवा ‘नाही’मध्ये असायचे. बारामतीपासून त्यांनी त्यांची कारकीर्द सुरू केली आणि सर्वोच्च स्थानावर ते पोहोचले. असे खूप कमी लोक आहेत जे मोठे झाले तरी त्यांची नाळ जमिनीशी जुळलेली असते, त्यात अजितदादा एक आहेत.

दादांच्या अपघातातील दोषींना फासावर लटकवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची शहांकडे मागणी

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला यंदाच्या महिन्यात 10 महिने पूर्ण होतील. त्यांच्या विमानाचा अपघात झाला की हा घातपात होता? या सवाल अनेकदा उपस्थित करण्यात येतो. विशेष म्हणजे गेल्या 10 महिन्यांमध्ये याबाबत सरकारकडूनही स्पष्टता आली नसल्याने अनेकदा विरोधकांकडून तसेच अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनीही अनेकदा शंका उपस्थित केली आहे. अशामध्ये सोमवारी (16 नोव्हेंबर) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पुणे जिल्हा परिषदेच्या पहिल्या मजल्यावर अजित पवारांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांच्या विमान अपघातावर भाष्य केले.
भाषणादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजितदादांच्या जाण्याने अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने या घटनेबाबत चर्चा झाल्या आहेत. सर्वसामान्य माणसालाही नेमके काय घडले, हा अपघात होता की त्यामागे आणखी काही कारण होते, असा प्रश्न पडत आहे. त्यामुळे या प्रकरणातील खरी माहिती समोर येणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठीचौकशीचा अहवाल लवकरात लवकर समोर येणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याकडे अहवाल लवकर मिळावा, अशी विनंती केली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या घटनेत कोणी दोषी असेल, तर त्याला फासावर लटकवता आले पाहिजे. मात्र, हा अपघात असेल, तर त्याबाबतही स्पष्टता मिळणे गरजेचे आहे. कारण या घटनेमुळे सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झालेला आक्रोश आणि संभ्रम दूर झाला पाहिजे. अशी विनंती आपण अमित शहा यांच्याकडे केली. त्यावर त्यांनी अहवाल लवकर आणण्यात येईल, अशी ग्वाही दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकर्‍यांचे अश्रू पुसणे हीच दादांना श्रद्धांजली-सुनेत्रा पवार
दुष्काळावर बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, शेतकरी हा अजित पवार यांच्या कामाचा केंद्रबिंदू होता. दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना आधार देणे आणि त्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसणे, हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पुणे जिल्ह्याचा विकास अधिक वेगाने करण्याचा आहे. यासाठी जनतेच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा आणि अजित पवार यांनी सुरू केलेली विकासाची वाट पुढे नेऊ, असा संकल्प करण्याचे आवाहन सुनेत्रा पवार यांनी यावेळी केले.अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला आहे, अशा शब्दांत सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांप्रती भावना विवश केल्या. तसेच अजितदादांचा प्रवास अर्धवट राहिला असेल, पण त्यांच्या स्वप्नांचा प्रवास आम्ही पूर्ण करू. त्यामुळे अजित पवार यांच्या विकासकामांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपण सर्वांनी स्वीकारली पाहिजे, असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी यावेळी केले.

 

Back to top button