केंद्राचे आणि राज्याचे गृहमंत्री पुण्यात फुगड्या घालत आहेत का?

सेलिब्रिटींना माफियांच्या धमक्यावरून हर्षवर्धन सपकाळ यांचा निशाणा

मुंबई /16 नोव्हेंबर : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था रसातळाला गेली असून माफिया खुलेआम धमक्या देत आहेत. बॉलिवूड कलाकारांच्या घरासमोर जाण्यापर्यंत या गुंडांची मजल गेली आहे. गुजरातच्या तुरुंगातून माफिया राज चालवले जात असून केंद्रीय गृहमंत्री ही टोळी चालवत आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज (16 नोव्हेंबर) केला.
बॉलिवूडमधील अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक यांना गुंडांकडून धमक्या दिल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ यांनी कायदा आणि सुव्यस्थेच्या मुद्यावरून गृह खात्याला लक्ष्य केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात काय फुगड्या घालत आहेत का? असा संतप्त सवालही सपकाळ यांनी केला.
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार केल्यानंतर आता अभिनेते अमिताभ बच्चन यांना लक्ष्य केले जात

Back to top button