शेतकर्यांच्या कर्जमाफीचा शब्द पाळू
महसूल मंत्री बावनकुळेंचा ‘शब्द’

मुंबई/3 फेब्रुवारी -राज्यातील गरीब शेतकर्यांसाठी सरकार लवकरच ठोस पावले उचलणार असून, शेतकरी कर्जमाफीचा दिलेला शब्द नक्की पाळला जाईल, असा ठाम विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी स्पष्ट केले की फार्महाऊसधारक किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम शेतकर्यांचा विचार न करता, वर्षानुवर्षे शेतात मेहनत करणार्या गरीब शेतकर्यांसाठीच ही कर्जमाफी लागू केली जाईल. बावनकुळे म्हणाले की कर्जावर व्याज आणि व्याजावर व्याज वाढत असल्यामुळे अनेक शेतकरी मानसिक तणावाखाली येतात आणि टोकाचा निर्णय घेण्याचा विचार करतात. अशा परिस्थितीत सरकार शेतकर्यांना एकटे सोडणार नाही. धाराशिव जिल्ह्यातील येणेगुर येथे झालेल्या सभेत त्यांनी सांगितले की अनेक शेतकरी 30-40 वर्षे शेतात कष्ट करतात, तरीही कर्जातून मुक्त होऊ शकत नाहीत. अशा शेतकर्यांना आत्महत्येपर्यंत जाण्याची वेळ येऊ देणार नाही. बावनकुळे यांनी पुढे सांगितले की कर्जमाफीपुरती मर्यादित राहणार नाही, तर पुढील काळात शेतकर्यांना वारंवार कर्ज घेण्याची गरज भासू नये, यासाठी दीर्घकालीन उपाययोजना सुरू केली जाईल. या उपाययोजनांमध्ये शेती उत्पन्न वाढवणे, खर्च कमी करणे आणि शाश्वत शेतीला चालना देणे यासारखे मुद्दे समाविष्ट आहेत. सरकार फक्त गरीब शेतकर्यांनाच कर्जमाफी देणार असल्याने कोणते शेतकरी यासाठी पात्र ठरतील आणि कोणाला वगळले जाईल, तसेच गरिबी ठरवण्याचे निकष काय असतील, हे अजून शासित राज्यांमध्ये लाडकी बहीण योजना बंद करण्यात आल्याचा आरोपही केला. मात्र देशातील भाजपशासित राज्यांमध्ये ही योजना सुरू असून, महाराष्ट्रातही नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही योजना सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यासोबतच, केंद्र सरकारने ‘एक कोटी लखपती दीदी’ योजना सुरू केली असून, आता राज्यातील महिलांना विनातारण, विनाहमी पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज मिळणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. हे सर्व घोषण्या धाराशिव जिल्ह्यातील येणेगुर येथे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेत त्यांनी केल्या.




