शरद पवारांसाठी राज्यसभा सोडण्यास उबाठाचा नकार

वरुण सरदेसाई थेटच बोलले

मुंबई/27 फेब्रुवारी – राज्यातून निवडून देण्याच्या राज्यसभेच्या सात जागांसाठी होणार्‍या निवडणुकीत महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. मात्र या एका जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू असून, त्यावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. यासंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) च्या नेत्यांची बैठक पार पडली. मात्र या बैठकी तूनही तोडगा निघा लेला नाही. यातच उद्धव सेनेच्या ने त्यांनी काही झाले तरी राज्यसभेच्या जागेवरील दावा सोडणार नसल्याचे म्हटले आहे.
महाविकास आघाडीत सर्वात जास्त आमदार उद्धवसेनेचे आहेत. त्यामुळे ही जागा आम्हाला मिळावी, असा आग्रह उद्धवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत याबाबत एकमत झालेले नाही. त्यामुळे ही जागा कोणाला सुटणार याकडे लक्ष लागले आहे. यानंतर आता उद्धवसेनेचे आमदार वरूण सरदेसाई यांनीही प्रतिक्रिया देताना राज्यसभेच्या जागेवरील दावा सोडणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. राज्यसभेच्या जागेसाठी कुठल्याही परिस्थितीत आम्ही आमचा दावा सोडणार नाही. आमच्या पक्षातील आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपले मत मांडले आहे. सन 2020 साली आम्ही राष्ट्रवादीच्या फौजिया खान यांच्या उमेदवारीवेळी मदत केली होती. आता संख्याबळानुसार आमचे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे जर आमचा खासदार कार्यकाळ पूर्ण करत असेल तर आमच्याच पक्षाचा उमेदवार राज्यसभेसाठी जाईल. शरद पवार हे मोठे नेते आहेत, शरद पवार उमेदवार म्हणून इच्छुक असतील आणि त्यांच्या नेत्यांकडून तसेच महाविकास आघाडीकडून तसे बोलले गेले तरीही आम्ही आमचा राज्यसभेच्या जागेसाठीचा दावा सोडणार नाही, असे वरूण सरदेसाईंनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button