नऊ आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या

गडचिरोलीचे निलोत्पल यांची कोल्हापूरला बदली, एम. रमेश यांच्याकडे जिल्ह्याची धुरा

मुंबई/20एप्रिल- राज्याच्या गृह विभागाने सोमवारी (20 एप्रिल) राज्यातील नऊ वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. या बदल्यांमध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, जळगाव, वाशिम आणि गडचिरोली आदी जिल्ह्यांचा समावेश असून, अनेक महत्त्वाच्या पदांवर फेरबदल करण्यात आले आहेत.
पुणे शहरातील पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांची सातारा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पुण्यातीलच उपायुक्त राजकुमार शिंदे यांची वाशिमच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे. सातार्‍याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सांगलीच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली असून, सांगलीचे विद्यमान अधीक्षक संदीप घुगे यांची मुंबईतील राज्य गुप्तवार्ता विभागात पोलीस उपायुक्त (सुरक्षा) म्हणून बदली करण्यात आली आहे. जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची पुण्यातील राज्य गुन्हे अन्वेषण विभागात (उखऊ) पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. धुळेचे अधीक्षक श्रीकांत धिवरे आता जळगावचे नवे पोलीस अधीक्षक असतील.
गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांची कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. कोल्हापूरचे विद्यमान अधीक्षक योगेश गुप्ता यांना पदोन्नती देत गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तसेच गडचिरोलीचे अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश यांना पदोन्नती देत त्याच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. या बदल्यांमुळे राज्यातील पोलीस प्रशासनात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button