सुनेत्रा पवार यांचा विजयाचा मार्ग मोकळा

23 उमेदवार रिंगणात कायम

23 उमेदवार रिंगणात कायम

पुणे /9 एप्रिल: राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अर्ज माघारी घेत असल्याची घोषणा केली. यावेळी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी फोन करुन विनंती केल्याची तसेच आमदार रोहित पवार यांनी देखील सकाळी सकाळीच भेट घेतल्याची माहिती दिली. तसेच, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील सूचना केल्याचं उल्लेख करत सपकाळ यांनी काँग्रेसने निवडणुकीत माघार घेतल्याचं सांगितलं.
बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 30 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. शेवटच्या दिवशी अर्ज माघारी घेण्याची वेळ संपली आहे. तत्पूर्वी, काँग्रेस उमेदवार आकाश मोरे यांनीही आपला अर्ज माघारी घेतला. त्यामुळे, बारामती विधानसभा मतदारसंघातील अर्ज दाखल केलेल्या 53 पैकी एकूण 30 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. मात्र, बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले आणि करुणा मुंडे- शर्मा यांचा अर्ज कायम आहेत. त्यामुळे, बारामती पोटनिवडणुकी एकूण 23 जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, गुरुवारी सहा जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले होते, त्यानंतर आज 24 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे, एकूण, 30 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. बारामती: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने ही मोठी घोषणा केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या निर्णयाची अधिकृत घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्षांनी राज्यातील प्रमुख नेत्यांच्या भावना केंद्रीय नेतृत्वापर्यंत पोहोचवल्यानंतर, हायकमांडने माघार घेण्यास हिरवा कंदिल दाखवला. त्यानंतर पत्रकार परिषदेतून हा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीचे नेते गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्नशील होते. काँग्रेसने या निवडणुकीसाठी आकाश मोरे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा विजयाचा मार्ग अधिकच सुकर झाल्याचे मानले जात आहे.पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ यांनी अजित पवार गटाच्या भाजपसोबतच्या युतीवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादीचा अजित पवार गट भाजपसारख्या विखारी पक्षासोबत राहू नये. सत्तेसाठी लाचार होऊ नये, असे ते म्हणाले. अजित पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने अशी भूमिका घेणे दुर्दैवी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

संबंधित बातम्या

Back to top button