शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली

पुणे /22 फेब्रुवारी : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची रविवारी (22 फेब्रुवारी) पुन्हा एकदा तब्येत खालावल्याची बातमी समोर आली आहे. त्यांना रविवारी सकाळी पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर शरद पवार हे पवार कुटुंबाचा मुख्य आधारस्तंभ म्हणून खंबीरपणे उभे राहिले आहेत. असे असताना त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असली तरीही सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तसेच, त्यांना उपचारानंतर दोनच दिवसात सोडण्यात येईल, असेही सांगितले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शरद पवार यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने त्यांना अशक्तपणा जाणवत आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना सलाईन लावण्यात आली आहे.




