विदर्भाच्या फॅशन विश्वात श्रद्धा मॉलचे दिमाखदार उद्घाटन
तारक मेहता मालिकेतील कलाकारांच्या उपस्थितीत सोहळ्याची धूम

* विदर्भातील सर्वात मोठे कापड दालन आता ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज
अमरावती /22 फेब्रुवारी : शहराच्या वैभवात मोलाची भर घालत, तब्बल 1 लाख 20 हजार चौरस फूट क्षेत्रफळात विस्तारलेल्या विदर्भातील सर्वात भव्य ’श्रद्धा रिअल होलसेल मॉल’चे रविवारी अत्यंत उत्साहात लोकार्पण करण्यात आले. ’तारक मेहता का उल्टा चष्मा’ या प्रसिद्ध मालिकेतील लोकप्रिय कलाकार मुनमुन दत्ता (बबीताजी), खुशी माली (सोनू) आणि नितीश भलुनी (टप्पू) यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला चांदणी झळाळी प्राप्त झाली होती. नांदगाव पेठ जवळील बोरगाव धर्माळे येथील बिझीलँड संकुलात साकारलेले हे भव्य मॉल आता संपूर्ण विदर्भासाठी फॅशनचे मुख्य केंद्र ठरले असून, पहिल्याच दिवशी हजारो नागरिकांनी येथे गर्दी केली होती. 2006 मध्ये एका छोट्या व्यवसायापासून सुरू झालेला हा प्रवास आज एका वटवृक्षाच्या स्वरूपात उभा राहिला आहे. बिझीलँड संकुलातील गल्ली क्रमांक एल-3 आणि एल-4 मध्ये हे तीन मजली भव्य दालन साकारले आहे. या लोकार्पण सोहळ्याला आध्यात्मिक क्षेत्रातील महान विभूती अंजनगावसुर्जी येथील देवनाथ मठाचे पीठाधिश्वर स्वामी जितेंद्रनाथ महाराज आणि शिवधारा आश्रमाचे संस्थापक संत साई डॉ. संतोष कुमार महाराज यांची वंदनीय उपस्थिती लाभली होती. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांनीही या सोहळ्याला हजेरी लावली. यामध्ये खासदार बळवंत वानखडे, आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके, आमदार राजेश वानखडे, पोलीस आयुक्त राकेश ओला, महापौर श्रीचंद तेजवाणी, उपमहापौर सचिन भेंडे, माजी खासदार नवनीत राणा, माजी मंत्री ड. यशोमती ठाकूर, ज्येष्ठ संपादक नानक आहुजा, अनिल अग्रवाल, विलास मराठे आणि बिझीलँडचे जयराज बजाज यांचा समावेश होता. या मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा द्विगुणित झाली. या मॉलची रचना ग्राहकांच्या सोयीचा विचार करून अत्यंत सूक्ष्म नियोजनाने केली आहे. तळमजल्यावर लहान मुले आणि पुरुषांच्या कपड्यांचा अफाट संग्रह आहे. विशेषतः नववधूंसाठी साड्यांचे स्वतंत्र दालन, जोधपुरी ब्लेझर, कोट-सूट आणि पुरुषांच्या पारंपारिक पोषाखांची मोठी मालिका येथे उपलब्ध आहे. तिसर्या मजल्यावर घाऊक दरातील साड्या, हातमाग वस्तू आणि मॅचिंग सेंटरची उत्तम सुविधा देण्यात आली आहे. ग्राहकांच्या सुविधेसाठी एकाच वेळी 150 लोक जेवण करू शकतील असे प्रशस्त उपहारगृह आणि मोठ्या वाहनतळाची व्यवस्थाही येथे करण्यात आली आहे. विदर्भातील ग्राहकांना एकाच छताखाली जागतिक दर्जाची फॅशन आणि घरगुती वातावरण देण्याचा प्रयत्न या मॉलच्या माध्यमातून यशस्वी झाला आहे.
एकाच छताखाली फॅशनचा महाकुंभ-श्रद्धा रिअल होलसेल मॉल म्हणजे विदर्भातील ग्राहकांसाठी पर्वणीच आहे. येथे तीन मजल्यांवर कपड्यांचे अफाट विश्व साकारले असून, विशेषतः लग्नसराईसाठी लागणारे जोधपुरी सूट, डिझायनर साड्या आणि मुलांच्या कपड्यांचे हजारो प्रकार उपलब्ध आहेत. 150 आसनक्षमतेचे उपहारगृह आणि प्रशस्त वाहनतळ यामुळे ग्राहकांचा खरेदीचा अनुभव अधिक सुखकर होणार आहे.




