उद्धव ठाकरेंंनी विधान परिषदेवर जावे, काँग्रेसला राज्यसभेची संधी हवी

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

पुणे/22 फेब्रुवारी : राज्यसभेच्या निवडणुकीत पूर्वी शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेसचा एक उमेदवार निवडून गेला होता; परंतु, विधिमंडळातील सध्याचे संख्याबळ पाहता आता महाविकास आघाडीचा एकच उमेदवार राज्यसभेवर निवडून जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रत्येक पक्ष दावा करत आहे. महाविकास आघाडी म्हणून राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जाऊ. महाविकास आघाडीचे प्रतिनिधी म्हणून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावे आणि राज्यसभेसाठी काँग्रेसला संधी द्यावी, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, गटनेते ड. रामचंद्र उर्फ चंदू कदम, माजी आमदार रमेश बागवे, मोहन जोशी, माजी महापौर प्रशांत जगताप, माजी आमदार दीप्ती चवधरी, आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button