बायोगॅस धोरणासाठी 500 कोटींची तरतूद

शिक्षकांनाही मोठा दिलासा

मुंबई/22एप्रिल– शहरातील कचर्‍याची पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावता यावी याकरिता राज्य सरकारने कॉम्प्रेस्ड बायोगॅस (बीएनजी) धोरण आखले असून त्याकरिता 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हे प्रकल्प खासगीकरण आणि हायब्ऱिड अँन्युएटी तत्त्वावर राबविण्यात येणार आहेत.
दिवसेंदिवस कचर्‍याचा प्रश्न वाढत चालला असून त्यामुळे अनेक पर्यावरणविषयक समस्या उद्भवू लागल्या आहेत. या धोरणामुळे कचर्‍यामुळे निर्माण होणार्‍या विविध समस्या, पाण्याच्या स्त्रोतांचे प्रदूषण कमी होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती स्थापन करण्यात येणार आहे. जमिनीचा र्‍हास, वायु प्रदूषण, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी नागरी कचरा आणि कृषी कचरा स्त्रोतांवर बीएनजी उपक्रमांना प्रोत्साहन देणे, हा धोरणाचा उद्देश आहे.
बीएनजीच्या
उत्पादनास आणि घनकचरा व्यवस्थापन यंत्रणेच्या एकत्रिकरणास प्रोत्साहन देणे, राज्याच्या नागरी भागातील कचर्‍याचे विलगीकरण, संकलन, प्रक्रिया आणि स्वच्छ ऊर्जेत रुपांतर करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम करणे., कचर्‍याचे ऊर्जा आणि खतामध्ये रूपांतर करून रोजगार आणि संपत्ती निर्माण करणे., सीबीजी प्रकल्पांसाठी किमान 200 टन प्रतिदिन क्षमतेचा निकष, हे प्रकल्प स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, खासगी विकासक आणि तेल व वायू वितरण कंपन्यांमार्फत ग्रीनफिल्ड किंवा ब्राऊनफिल्ड स्वरूपात राबविता येतील. प्रकल्पांना एक खिडकी मंजुरी, जमीन, परवानग्या, आवश्यक जमीन भाडेतत्त्वावर जलदगतीने देण्याची व्यवस्था
घनकचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी वापरण्यात येणार्‍या जागेवरील भार कमी होईल, सार्वजनिक आरोग्यात सुधारणा होईल आणि हरितगृह वायुचे उत्सर्जन कमी झाल्यामुळे हवेची गुणवत्ता वाढेल. ऊर्जा आणि आयात घट होईल. जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी होऊन, कार्बन उत्सर्जनात घट, वाहतूक, औद्योगिक आणि घरगुती क्षेत्रासाठी स्वच्छ इंधनाचा पर्याय उपलब्ध होईल. नागरी सेंद्रीय, शेतातील, पशुधन व इतर जैवविघटनशील कचरा उघड्यावर जाळण्याला अटकाव होऊन प्रदूषण कमी होईल. सेंद्रीय कचर्‍याचे संकलन, साठवणूक, वाहतुकीसाठी पायाभूत सुविधा निर्मिती, सीबीजी प्रकल्पासाठी कच्च्या मालाचा पुरवठा, कचर्‍यापासून ऊर्जा आणि सेंद्रीय खत निर्मिती करुन शेतकर्‍यांना पूरक उत्पन्न मिळवता येईल.

संबंधित बातम्या

Back to top button