बहिणीनेही 3 मुलांसह विहिरीत उडी मारली
6 जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात खळबळ

भोपाल/29 ऑक्टोबर – आत्महत्येच्या हादरवून टाकणार्या एका घटनेने मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एका बहिणीच्या मृत्यूनंतर बसलेल्या धक्क्यातून आणि नैराश्यातून दुसर्या बहिणीने 3 लहान मुलांसह विहिरीत उडी मारून टोकाचे पाऊल उचलले. या भीषण दुर्घटनेत दोन बहिणी आणि चार लहान मुलांसह एकूण 6 जणांचा मृत्यू झाल्याची झाला.
एकमेकींवर खूप प्रेम करणार्या दोन बहिणींनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये आपल्या चार मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या भीषण कृत्यात एका गर्भवती महिलेसह तिच्या बहिणीचा मृत्यू झाला आहे. पहिली घटना बुधवारी शिवपुरीच्या गुंगरगाव येथे घडली. 35 वर्षीय अंजली रावतने कथितरित्या आपल्या तीन मुलींना विहिरीत ढकलले आणि त्यानंतर आपल्या 6 वर्षांच्या मुलाला प्रशांतला, घेऊन स्वतःही विहिरीत उडी मारली. सुदैवाने, अंजलीची मोठी मुलगी मोनिका स्वतःला आणि तिच्या दोन लहान बहिणींना वाचवण्यात यशस्वी झाली. ती लगेच घरी धावत गेली आणि तिने आपल्या कुटुंबीयांना या घटनेबद्दल सांगितले. कुटुंबीय तात्काळ घटनास्थळी धावून आले आणि त्यांनी अंजली व प्रशांतला विहिरीतून बाहेर काढले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि दोघांचाही मृत्यू झाला होता. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, अंजलीचा पती धर्मवीर सिंग रावत याचा दीड महिन्यापूर्वी एका अपघातात मृत्यू झाला होता. तेव्हापासून ती तीव्र मानसिक तणावाखाली होती. दरम्यान सेसाई गावात घडलेली दुसरी घटना पहिल्या घटनेशी संबंधित असल्याचे स्थानिक सांगत आहेत.





