SIR ला घटनाबाह्य घोषित करता येणार नाही

सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली/27 मे-सर्वोच्च न्यायालयाने आज एसआयआर संदर्भात एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने, एसआयआर प्रक्रियेत कोणतीही त्रुटी नव्हती. त्यामुळे त्याला घटनाबाह्य घोषित करता येणार नाही असा महत्वाचा निर्णय दिला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने आज आपला निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने आज डखठ विषयी सुनावणी करताना, निवडणूक आयोगाने आपल्या अधिकारांचा वापर केला, अधिकारांचे उल्लंघन केलेले नाही. संपूर्ण प्रक्रिया घटनाबाह्य घोषित केली जाऊ शकत नाही असा महत्वाचा निर्णय दिला आहे.
न्यायालयाने आज सुणवणी दरम्यान, आमचा विश्वास आहे की एसआयआर दरम्यान उचललेली पावले योग्य होती. असे म्हटले. यावर असा युक्तिवाद करताना, स्वतःला सिद्ध करण्याची जबाबदारी मतदारावर टाकण्यात आली होती. आम्ही हे मान्य करत नाही. जरी कोणी आपल्या पूर्वीच्या निवासस्थानापासून दूर राहत असले, तरी ते जुन्या प्रक्रियेतून (एसआयआर) वगळले जात नाही. त्यांचे नाव किंवा त्यांच्या कुटुंबाचे नाव जुन्या एसआयआरमध्ये कायम राहील. एसआयआरमधून नावे वगळणे बेकायदेशीर मानले जाऊ शकत नाही.असे म्हटले गेले. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात, निवडणूक आयोगाने कागदपत्रांच्या सत्यतेच्या आधारावर त्यांचा आपल्या यादीत समावेश केला. याला मनमानी म्हणता येणार नाही. असे म्हटले आहे.एसआयआरचा उद्देश केवळ लोकांना वगळणे हा होता, असे म्हणता येणार नाही. जर कागदपत्रे चुकीची आढळली, तर निवडणूक आयोग एखाद्या व्यक्तीचा मतदार यादीत समावेश करण्यास नकार देऊ शकतो. याचा अर्थ निवडणूक आयोगाने त्या व्यक्तीचे नागरिकत्व निश्चित केले असा लावता येणार नाही.

संबंधित बातम्या

Back to top button