शरद पवारांनी राज्यसभेत येण्यासाठी सर्वांचा आग्रह
सुप्रिया सुळे यांची माहिती

नवी दिल्ली /25 फेब्रुवारी : ’सर्वांचा आग्रह आहे की महाविकास आघाडीच्या वतीने शरद पवारांनी राज्यसभेवर जावे. जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची वेळ मागितली आहे.
वेळ पडल्यास मी देखील दिल्लीतील काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्याशी बोलेल.’ असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केले. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई आणि संजय राऊत यांच्याशी याबाबत बोलले आहे, तसेच बाराम तीची विधान सभा पोट निवडणूक बिन विरोध झाली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘शरद पवारांनी राज्यसभेत जावे यासाठी अनेकांचा आग्रह आहे. एक दोन दिवसात जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे याबाबत शरद पवारांशी बोलतील. आदित्य ठाकरे यांनी काय वक्तव्य केले याची मला माहिती नाही. मात्र चर्चा करायला काहीच हरकत नाही. सहा दशके शरद पवार संसदीय राजकारणात आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांच्या आशीर्वादाने त्यांनी राज्यसभेवर यावे, ही इच्छा आहे,’ असेही त्या म्हणाल्या. डीजीसीएने व्हीएसआर कंपनीची चार विमाने ग्राउंड करण्याचा निर्णय घेतला. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘यासाठी विमान वाहतूक मंत्रालय आणि रोहित पवार यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील महत्वाची व्यक्ती गेली आहे. हे दुःख 5 कुटुंबातील लोकांचे आहे.




