लोकशाही, संविधान धोक्यात

नवी दिल्ली/24 फेब्रुवारी – भोपाळ येथे आयोजित एका जनसभेमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिका र्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. भारत-अमेरिका व्यापार करार शेतकर्‍यांची दुरावस्था, बेरोजगारी आणि लोकशाहीची सद्यस्थिती यावरून त्यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. देशाचा स्वाभिमान कमकुवत केला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे, परंतु अमेरिकेसोबत झालेल्या व्यापार करारामध्ये देशाच्या मान-प्रतिष्ठेशी तडजोड करण्यात आली आहे असं म्हणत खरगे यांनी सरकारने देशाचा स्वाभिमान गहाण ठेवल्याचा गंभीर आरोप केला.

संबंधित बातम्या

Back to top button