काँग्रेस खा. रेणुका चौधरी यांना हक्कभंगाची नोटीस

नवी दिल्ली– संसदेच्या आवारात एका श्वा नाला आणल्या बद्दल आणि खासदारां विरुद्ध अपमाना स्पद टिप्पणी केल्या बद्दल काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार रेणुका चौधरी यांना हक्क भंगाची नोटीस बजावण्यात आली आहे. राज्यसभेच्या हक्कभंग समितीने त्याांच्याविरुद्धच्याद तक्रार दाखल घेत 23 फेब्रुवारीपर्यंत आरोपांचे उत्तर देण्यास सांगितले. भाजप खासदार ब्रिजलाल आणि इंदू बाला गोस्वामी यांनी चौधरी यांच्याविरुद्ध हक्क भंगाची नोटीस सादर केली होती. जी राज्यसभेच्या अध्यक्षांनी समितीकडे पाठवली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत समितीने या प्रकरणाची तपासणी केली आणि या प्रकरणावर त्यांच्या लेखी प्रतिक्रिया मागवण्याचा निर्णय घेतला. दरम्योन, हिवाळी अधिवेशनादरम्यान चौधरी यांनी 1 डिसेंबर रोजी संसदेत त्यांच्या कारमधून एका श्वाघनाला आणले होते. यावरती काही सदस्यांनी आक्षेप घेतला. त्या वर चौधरी यांनी ‘आत बसलेले लोक चावतात, श्वायन चावत नाहीत’, असे वादग्रस्तप विधान केले होते.




