वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

जांभळी वनपरिक्षेत्रातील घटना

गोंदिया/15 सप्टेंबर-शेळ्यांसाठी झाडाच्या फांद्या आणण्यासाठी जंगल शिवारात गेलेल्या वृद्ध शेतकर्या वर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना एफडीसीएमच्या जांभळी-1 वनपरिक्षेत्रात मंगळवारी 15 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली.
वातू बकाराम राऊत (72) रा. झुरकूटोला ता. सडक अर्जुनी असे त्या मृत वृद्ध शेतकर्या चे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार वातू राऊत हे सकाळी शेळ्यांसाठी झाडाच्या फांद्या (चारा) आणण्यासाठी जंगलात गेले होते. दरम्यान, वनपरिक्षेत्र जांभळी-1 येथील पळसगाव बीट राखीव वनक्षेत्र कक्ष क्रमांक 524 येथे दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती त्यांच्यासोबत असलेल्या इतर शेतकर्यांतनी गावात दिली. त्यानंतर पाटेकुर्रा येथील सरपंच प्रशांत बालसनवार यांनी वन विभाग व पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच वन विभाग व पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले.

Back to top button