भारत 114 राफेल खरेदी करणार
3.25 लाख कोटींच्या डीलला मंजुरी

नवी दिल्ली/12 फेब्रुवारी – भारत सरकारने संरक्षण क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकत 114 डसॉल्ट राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. संरक्षण अधिग्रहण परिषदेनं या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला असून, या व्यवहाराची अंदाजे किंमत 3.25 लाख कोटी आहे.ही परिषद संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या मंजुरीमुळे भारताच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या लढाऊ विमान खरेदी व्यवहारांपैकी एकाचा मार्ग मोकळा झाला आहे.




