मंत्री नरहरी झिरवाळांच्या अश्लील व्हिडिओने खळबळ

राष्ट्रवादीचा नेता शासकीय निवासस्थानात ट्रान्सजेंडर व्यक्तीसोबत कॅमेर्‍यात कैद

मुंबई/25 मार्चराज्याच्या राजकीय वर्तुळात आज एका अत्यंत वादग्रस्त आणि खळबळजनक व्हिडिओमुळे मोठी खळबळ उडाली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एका ट्रान्सजेंडर व्यक्तीसोबतचा अश्लील व्हिडिओ समोर आला असून, यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, या व्हिडिओनंतर काँग्रेसने नरहरी झिरवाळ यांची मंत्रीपदावरून तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, ट्रान्सजेंडर असलेल्या पवन यादव याच्यासोबत मंत्री झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडिओ पवन यादव याचा भाऊ रवी यादव यांनी सार्वजनिक केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. पवन यादव हा ट्रान्सवूमन असून खंडणी गोळा करण्याचा व्यवसाय करत असल्याचा भावाचा आरोप आहे. यासंदर्भात याआधीच पवन यादव यांच्यावर मुंबईतील कुरार पोलिस ठाण्यात दमदाटी व खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. याचबरोबर, पवन यादव याच्याशी संबंधित प्रकरणात इतर काही मंत्र्यांची नावे देखील पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.दरम्यान, या कथित व्हिडिओमध्ये दिसणार्‍या प्रकारांमुळे शासकीय निवासस्थानाच्या वापराबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींनी अशा प्रकारे शासकीय सुविधांचा गैरवापर केल्याचा आरोप गंभीर मानला जात आहे.
नरहरी झिरवाळ यांचा हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून, या वृत्ताची आपली मातृभूमी पृष्टी करत नाही यासंदर्भात आम्ही नरहरी झिरवाळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.

नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण-हर्षवर्धन सपकाळ

राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होणे ही केवळ एक घटना नसून, महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाधक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. एक जबाबदार लोकप्रतिनिधी, ज्याच्यावर जनतेचा विश्वास आणि करदात्यांच्या पैशांची जबाबदारी आहे, त्याच्याकडून अशा प्रकारचे अश्लील आणि अनैतिक वर्तन होणे अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह आहे. हा प्रकार केवळ व्यक्तीगत मर्यादांचा भंग नाही, तर सार्वजनिक जीवनातील नैतिकतेलाच काळिमा फासणारा आहे, असेही सपकाळ म्हणाले. जनतेच्या विश्वासावर निवडून आलेल्या मंत्र्याने किमान नैतिकतेची चौकट तरी पाळावी, ही साधी अपेक्षा असते. मात्र, हा व्हिडिओ पाहता त्या अपेक्षांचा पूर्णपणे भंग झाल्याचे स्पष्ट होते. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्र्यांनी कोणतीही विलंब न लावता नरहरी झिरवाळ यांची मंत्रीपदावरून तात्काळ हकालपट्टी करावी.

संबंधित बातम्या

Back to top button