गांजाच्या झाडाची लागवड करणारा आरोपी ताब्यात
अकोट ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई

अकोला /17 नोव्हेंबर – ऑपरेशन प्रहार नार्को स्ट्राइक अंतर्गत 16 नोव्हेंबर रोजी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला गोपनीय माहिती मिळाली की ग्राम शहानुर येथील सचिन लक्ष्मण जांभळे याने त्याच्या गावातील घराच्या आवारामध्ये गांजाची झाडे लावलेली आहे. अशा माहितीवरून अकोट ग्रामीण पोलिसांनी सचिन लक्ष्मण जांभळे यांचे घरी जाऊन छापा टाकला असता तेथे हजर असलेले इसम नामे अनिललाल लालजी दांडेकर वय 31 वर्षे, रा. सोमठाणा, ता. चिखलदरा, ह. मु. शहानुर, ता. अकोट यांचे जवळून गांजाची लहान-मोठी एकूण 12 झाडे ज्याला पाने, फुले, बिया, कड्या, खोड व मुळासह एकूण 34 किलो 60 ग्रॅम किं. अं. 6,80,000/-रु. चा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून ताब्यात घेतला. त्यावरून आरोपी नामे सचिन लक्ष्मण जांभळे, वय 40 वर्षे, रा. शहानुर, ता. अकोट, जि. अकोला व अनिललाल लालजी खांडेकर यांनी विनापरवाना अवैधरित्या गांजाची झाडांची लागवड करून विक्री करण्याचे उद्देशाने मिळून आल्याने त्यांचे विरुद्ध अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन येथे अप. क्र. 722/2026, कलम 8(क ),20(ब ), ळळ(क ) एनडीपीएस अन्वये गुन्हा दाखल केला. सदरची कारवाई अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचे आदेशान्वये अप्पर पोलीस अधीक्षक निलेश पांडे, सहायक पोलीस अधीक्षक अकोट विभाग निखिल पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांचे मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्रीधर गुठ्ठे, पोउपनि वैभव तायडे, पोहेकॉ हरीश सोनवणे, राजेश्वर सोनोने, सागर नागे, गोपाल जाधव, विठ्ठल चव्हाण, शैलेश जाधव, सचिन कुलट, मपोहेकॉ उमा आसरे, पोकॉ अमोल म्हस्के, राजेश माळेकर, शुभम लुंगे यांनी केली.
अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी अमली पदार्थ विरुद्ध कारवाई तीव्र करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे अमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन केला असून सपोनि निलेश देशमुख यांचे 8888096046 या नंबर वर अमली पदार्थांची विक्री, साठवणूक, वाहतूक किंवा इतर अवैध धंद्याबाबत माहिती असल्यास नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे. आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल.





