19 न.प.च्या निवडणुका पुढे ढकलल्या

20 डिसेंबरला होणार मतदान

* 21 डिसेंबरला मतमोजणी

आयोगाच्या निर्णयामुळे इच्छुकांचा उडाला गोंधळ

मुंबई /30 नोव्हेंबर : राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींची निवडणूक 2 डिसेंबर रोजी होत आहे. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी म्हणजे 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना आणि प्रचाराला एक दिवस (1 डिसेंबर, रात्री 10 वाजेपर्यंत) शिल्लक असताना एक मोठी बातमी समोर आली आहे.
राज्यातील तब्बल 19 नगरपरिषदांच्या निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत. यामुळे या नगरपरिषदांमध्ये अस्वस्थता आहे. कारण पुन्हा निवडणुका जाहीर होतील तेव्हा नव्याने प्रचार करावा लागेल, पुन्हा खर्च करावा लागेल, नव्याने सभांचे नियोजन करावे लागेल. त्यामुळे उमेदवारांच्या पोटात आताच गोळा आला आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी नगर परिषदेची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. आता, येथे 20 डिसेंबरला मतदान होणार असून 21 डिसेंबरला मतमोजणी होत आहे. नगरसेवक पदाच्या दोन उमेदवारांनी आणि नगराध्यक्ष पदाच्या एका उमेदवारांनी अपील केल्याने निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये एका नगरसेवकपदाच्या उमेदवाराची याचिका कोर्टाने फेटाळली. मात्र, एक नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या बाजूने कोर्टाने निर्णय दिला. आकाश सुखदेव राऊत हे नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार होते. कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला आहे. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी यांच्या नामांकनात त्रुटी काढल्याने अर्ज बाद केला होता. अपील प्रकरणात न्यायालयाचा निर्णय 25 तारखेला आला आहे. आता, अर्ज मागे घेण्यापासून पुन्हा एकदा या ठिकाणी निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. यात अंजनगाव सुर्जी, अंबरनाथ, पंढरपूर, दिग्रस पांढरकवडा, वणी, कोपरगाव, देवळाली, नेवासा, पाथर्डी, घुग्गूस, बाळापूर, धर्माबाद, मुखेड, तळेगाव, पूर्णा, जिंतूर, अंबरनाथ, बारामती,फलटण या नगरपरिषदांतील प्रभागाचा समावेश आहे. सर्व 19 नगरपरिषदा अंबरनाथ बारामती फलटण महाबळेश्वर, पंढरपूर, दिग्रस पांढरकवडा, वणी, कोपरगाव, देवळाली, नेवासा, पाथर्डी, घुग्गूस, बाळापूर, धर्माबाद, मुखेड, तळेगाव, अंजनगाव सुर्जी, पूर्णा, जिंतूर.

संबंधित बातम्या

Back to top button