परिवर्तन प्रबोधिनीच्या राज्यस्तरीय कथा व काव्यस्पर्धेचा निकाल घोषित

अमरावती /24 नोव्हेंबर : परिवर्तन प्रबोधिनी, बिलीव्ह फाऊंडेशन व मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई यांच्या अनुदानातून आयोजित तिसरे परिवर्तन विचारवेध साहित्य संमेलन ज्येष्ठ साहित्यिक मा.चंद्रकांत वानखडे, यांच्या अध्यक्षतेखाली अभियंता भवन अमरावती येथे दि. 20 व 21 डिसेंबर 2025 रोजी पार पडणार असून त्यानिमित्याने भव्य राज्यस्तरीय कथा व काव्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.आयोजकांनी केलेल्या आवाहनानुसार राज्यस्तरीय कथा व काव्य स्पर्धेला महाराष्ट्रासह देश विदेशातून भरभरून प्रतिसाद मिळाला. एकूण 60 कथा आणि 83 कवितांच्या प्रवेशिका या स्पर्धेसाठी प्राप्त झाल्या होत्या.
त्यानुसार सर्वोत्कृष्ट तीन आणि एक उत्तेजनार्थ अशा चार क्रमांकांची निवड परीक्षकांकडून करण्यात आली. कथास्पर्धे साठीचा प्रथम क्रमांक अमोल गोंडचवर यांच्या ’मातेरं ’ या कथेला मिळाला असून द्वितीय क्रमांक विद्या निनावे यांच्या ’सरिता’ या कथेला, तृतीय क्रमांक मारोती कुळसंगे यांच्या विसावा’ या कथेला,उत्तेजनार्थ क्रमांक सीमा देशमुख यांच्या ’सांजवेळ’ या कथेला प्राप्त झाला आह. तर कविता स्पर्धेसाठीचा प्रथम क्रमांक निशा खापरे यांच्या ’माय मराठी ’ या कवितेला, द्वितीय क्रमांक हरिभाऊ गिरीपुंजे यांच्या ’माय मराठी’ तृतीय क्रमांक प्रकाश पाटील यांच्या ’मायबोली मराठी’ या कवितेला तर उत्तेजनार्थ क्रमांक विश्वभर पाठक यांच्या ’मराठीची वारी’ या कवितेला प्राप्त झाला आह. कथास्पर्धेसाठी जेष्ठ साहित्यिक,विचारवंत व समीक्षक डॉ. राजेंद्र राऊत व कथा कादंबरीकार संजय महल्ले यांनी परीक्षण केले असून संयोजन विशाल मोहोड यांनी केले. कविता स्पर्धेसाठी सुप्रसिद्ध कवयित्री मीनल येवले, कवी विशाल कन्हेरकर, संदीप देशमुख यांनी परीक्षण केले असून या स्पर्धेचे संयोजन नयन पर्‍हाड यांनी केले. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन तिसर्‍या परिवर्तन विचारवेध साहित्य संमेलनामध्ये सन्मानीत करण्यात येईल.असे मुख्य संयोजक डॉ.शोभा रोकडे व आयोजन समितीने कळविले आह.

संबंधित बातम्या

Back to top button