भातकुली तालुक्यात जि.प. व पं.स. कार्यकर्ता मेळावा
युवा स्वाभिमानच्या इच्छुक उमेदवारांनी दिल्या मुलाखती

अमरावती /23 नोव्हेंबर : भातकुली तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या दृष्टीने युवा स्वाभिमान पार्टीतर्फे आयोजित भव्य कार्यकर्ता मेळावा भातकुली येथे उत्साहात पार पडला. या मेळाव्याला पार्टीचे मार्गदर्शक सुनिल राणा यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेत पक्षाने रणनीती, संघटनबांधणी आणि उमेदवारांच्या निवड प्रक्रियेला वेग देण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
मेळाव्यात युवा स्वाभिमान पार्टीतर्फे निवडणूक लढण्याची इच्छा असलेल्या अनेक संभाव्य उमेदवारांनी जाहीर मुलाखती देत आपल्या भूमिका आणि जनतेसाठी करावयाच्या कामांची माहिती पक्षाला सविस्तर दिली. उमेदवारांमध्ये तरुण नेते, सामाजिक कार्यकर्ते, तसेच स्थानिक पातळीवर प्रभावी मानल्या जाणार्या प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश असल्याने मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यकर्ता मेळाव्यास राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीचे शैलेन्द्र कस्तुरे, प्रा. अजय गाडे, कमलकिशोर मालाणी, समाधान वानखडे, नगर पंचायत अध्यक्ष सौ.योगीता कोलटेके, उपाध्यक्ष प्रतीक कांडलकर, तालुका अध्यक्ष मंगेश इंगोले, आशिष कावरे, हर्षद वाचासुंदर यांची प्रमुख उपस्थिती होती.मेळाव्यात बोलताना मार्गदर्शक सुनील राणा यांनी सांगितले की,भातकुली तालुक्यात युवा स्वाभिमान पार्टी मजबूत असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये युवा शक्ती व येथील सामान्य नागरीक निर्णायक भूमिका बजावेल. पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता हा आमची ताकद असून पारदर्शक मुलाखत प्रक्रियेतून सक्षम, प्रामाणिक व जनतेसाठी काम करणार्या उमेदवारांची निवड होणार आहे. मेळाव्यात निवडणूक तयारी, प्रचाराची दिशा, बूथस्तरावरील संघटन आणि मतदारांशी संवाद वाढवण्याबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन देण्यात आले. युवा स्वाभिमान पार्टीने भातकुली तालुक्यात दमदार लढत देण्याचा निर्धार व्यक्त केला असून या बैठकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा संचारली. यावेळी सुत्र संचालक श्रीकृष्ण बैलमारे यांनी केल तर आभार प्रदर्शन राजु चुनकीकर यांनी केले. याप्रसंगी सरपंच सुभाष राऊत, अहेमद पठान, धमेंद्र मेहरे, डॉ.मालधुरे, मंगेश घाटे, सुमेध नकाक्षे, गौतम खंडारे, अविनाश सनके, नितीन गुळधे, विश्वास पाटील, अशोक मोहळे, ज्ञानेश्वर काळे, भरत गैरकर, मंगेश पेठेकर, प्रविण तायडे, गंगाधर मालठाने, सौ.मानकर ताई, बाळु फुकट, अविनाश काळे, श्रीकृष्ण पाटील, राजु तेलमोरे, मधुकर बाबुळकर, जयंत देशमुख, संजय चुनकीकर, राजु चुनकीकर, अरुण सहारे, नारायण आचलकाटे, शंकर डोंगरे, विजय पिंपळकर, श्रीराम कळसकर, भागिरथजी बुब, मुरलीधर लांडे, भाऊरावजी पाचपोर, लामसे काका, तुळशिरामजी गाडबैल, जफरभाई, रघुवंशी भैय्या, अवधुत तरोडे, राजु वानखडे, गणेश दहातोंडे, डॉ.कटयारमल, संदिप ढोले, श्रीकृष्ण बैलमारे, महेंद्र सिरसाठ, रामदास रंगारी, रविंद्र वानखडे, राजु हरणे, सुमीत खांडेकर, पद्दमाकर गुल्हाने, मिलींद गवघड, रामेश्वर सरडे, नारायण दंदे, पंकज रामेकर, अतुल झंझाट, आमेल गोमासे, रुपेश कळसकर, ड.मोहित कासट, अर्जुन दाते, निरज गवई, शुभम डोनालकर, पंकज थोरात, आदि असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




