देशात 4 नवीन कामगार संहिता लागू

आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल सोपी

एका वर्षाला ग्रॅच्युइटी; कामगारांना मोफत आरोग्य तपासणीसह अनेक हमी

नवी दिल्ली/21 नोव्हेंबर : केंद्रीय श्रममंत्री मनसूख मांडवीय यांनी शुक्रवारी (21 नोव्हेंबर) मोठी घोषणा केली. आजपासून म्हणजे शुक्रवारपासून देशात चार नव्या श्रम संहिता (छशु ङरर्लेीी उेवश 2025) लागू करण्यात आले आहेत. या चार संहितांमध्ये द कोड ऑन वेजेस 2019, द इंडस्ट्रीयल रिलेशन्स कोड 2020, द कोड ऑन सोशल सिक्युरिटी 2020 आणि द ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडिशन्स कोड 2020 याचा समावेश आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या 29 कायद्यांमध्ये सुधारणांसाठी या संहिता लागू करण्यात आल्या आहेत. नव्या लेबर कोडमुळे आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल सोपी होईल, असे सांगण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याबाबत ट्विट केले. ते म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरची ही सर्वात मोठी कामगार कायद्यातील सुधारणा असल्याचे म्हटले. श्रमेव जयते! आज, आमच्या सरकारने चार नव्या श्रम संहिता लागू केल्या आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात मोठ्या आणि सर्वात प्रगतीशील कामगार-केंद्रित सुधारणांपैकी ही एक आहे. हे आमच्या कामगारांना लक्षणीयरीत्या सक्षम करते. ते अनुपालन देखील लक्षणीयरीत्या सोपे करते आणि व्यवसाय करण्याच्या सुलभतेला प्रोत्साहन देते. त्यानंतर केंद्रीय मंत्री मनसूख मांडवीय यांनी पोस्ट करत याबाबत सविस्तर माहितीदेखील दिली आहे. सर्व कामगारांना वेळेवर किमान वेतनाची हमी मिळणार आहे. युवकांना नियुक्ती पत्र मिळण्याची हमी मिळेल. महिलांना देखील समान कामासाठी समान वेतन आणि सन्मानाची हमी, 40 कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षेची हमी मिळेल. निश्चित कर्मचार्‍यांना एका वर्षाच्या कालावधीनंतर ग्रॅच्युईटीची गॅरंटी मिळेल. 40 वर्षांच्यावरील श्रमिकांना दरवर्षी मोफत आरोग्य तपासणीची गॅरंटी मिळेल. ओव्हरटाईम केल्यास दुप्पट वेतनाची गॅरंटी, जोखीम असलेल्या क्षेत्रातील कामगारांना 100 टक्के आरोग्य सुरक्षेची गॅरंटी, आंतरराष्ट्रीय मानकांनुसार श्रमिकांना सामाजिक न्यायाची गॅरंटी मिळेल, असे मनसूख मांडवीय यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच, मनसूख मांडवीय पुढं म्हणाले हे बदल नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रमिकांच्या कल्याणासाठी घेतलेला ऐतिहासिक निर्णय आहे. नव्या सुधारणा आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. विकसित भारत 2047चे ध्येय गाठण्यासाठी नवी गती देईल, असे ते म्हणाले.

संबंधित बातम्या

Back to top button