उद्यापासून महा ग्रामीण क्रीडा महोत्सव; अमरावतीत उत्साहाला उधाण
राज्यभरातील अधिकारी, कर्मचारी होणार सहभागी

अमरावती /19 नोव्हेंबर : हनुमान अखाडा मैदानावर थंडीतही क्रीडास्पृहेला तापमान मिळणार आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेतर्फे आयोजित महा ग्रामीण क्रीडा महोत्सव 21 नोव्हेंबरपासून सुरू होत असून, तीन दिवस चालणार्या या महोत्सवात राज्यातील विविध शाखांमधील अधिकारी-कर्मचार्यांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे. आज दुपारी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बँकेचे चेयरमन मिलिंद घरड आणि सचिन माने यांनी सविस्तर माहिती दिली.
घरड यांनी सांगितले की, या स्पर्धांमध्ये एकूण 14 क्रिकेट संघ सहभागी होणार असून, एकूण 500 हून अधिक अधिकारी व कर्मचारी विविध क्रीडा प्रकारांत आपले कौशल्य सादर करतील. बँकेतील स्पर्धात्मकता, संघभावना आणि सहकाराचा आत्मा बळकट करण्यासाठी या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यंदाच्या स्पर्धांमध्ये क्रिकेटसह बॅडमिंटन, पिकलबॉल, कॅरम आणि बुद्धिबळ या खेळांचाही समावेश करण्यात आला आहे. स्पर्धांचे आयोजन उत्तमरित्या पार पडावे यासाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, हनुमान मंडळाकडून मैदान, पंच, स्कोरर्स तसेच इतर तांत्रिक सुविधा पुरवण्यात येणार असल्याची माहिती सचिन माने यांनी दिली. कार्यक्रमाचे उद्घाटन 21 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार असून, महोत्सवाचा समारोप 23 नोव्हेंबरला पार पडेल. स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे. बँकेतील विविध विभागांतील कर्मचारी या महोत्सवाकडे केवळ क्रीडा स्पर्धा म्हणून नव्हे तर परस्पर संवाद, एकोपा आणि ऊर्जा वाढवणारा उपक्रम म्हणून पाहात असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली. पत्रकार परिषदेत बँकेच्या कार्यप्रणाली व उपलब्ध सेवांची माहितीही देण्यात आली. महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे राज्यातील विविध जिल्ह्यांतील शाखांचे एकत्रीकरण झाल्यानंतर आता एकूण 750 शाखांमधून सेवा पुरवल्या जात आहेत. तेरा प्रादेशिक कार्यालयांच्या माध्यमातून बँकेचे कामकाज राबवले जात असून, 3 हजाराहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी बँकेच्या कार्यभारात योगदान देत आहेत. राज्यातील ग्रामीण भागापासून शहरी परिसरापर्यंत बँकेचे जाळे विस्तारले असून, 1 कोटीहून अधिक खातेदार सध्या बँकेत व्यवहार करीत आहेत. अत्याधुनिक सुविधा, डिजिटल बँकिंग, जलद व्यवहार सेवा आणि ग्राहक केंद्रित उपक्रमांमुळे बँकेचा व्यवसाय 41 हजार कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. ग्रामीण भागातील आर्थिक प्रगतीसाठी विविध कर्ज योजना, महिला बचत उपक्रम, शेतीसाठी विशेष कर्ज सुविधा आणि ग्रामीण उद्योगांना प्रोत्साहन देणार्या योजनाही बँकेमार्फत राबविल्या जात असल्याचे अधिकारी सांगतात. महा ग्रामीण क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून कर्मचारी व अधिकारी यांचा उत्साह वाढेल आणि बँकेमधील टीम स्पिरिट अधिक बळकट होईल, असा विश्वास आयोजन समितीने व्यक्त केला आहे. हनुमान अखाडा मैदानावर होणार्या या स्पर्धांकडे क्रीडा रसिकांचेही लक्ष लागले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा फैसला मंगळवारी
आरक्षण 50 टक्क्यांच्या वर गेले असून आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. सूर्य कांत आणि न्या. जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली होती. राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाचे निकष निश्चित करण्यासाठी बांठिया आयोगाने नेमला होता. या आयोगाचा अहवाल राज्य सरकारने अहवाल स्वीकारला आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेताना ओबीसी आरक्षणाबाबत बांठिया आयोगाच्या अहवालापूर्वीची स्थिती राहील, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही राज्य सरकारने या आदेशाचा स्वत:च्या सोयीने अर्थ लावत नगरपरिषदा, महापालिका, तसेच जिल्हा परिषदांमध्ये सरसकट 27 टक्के आरक्षण ओबीसींसाठी लागू करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार ग्रामविकास विभागाने पंचायत समिती, जिल्हा परिषदांसाठी आणि नगरविकास विभागाने नगरपरिषदा, नगरपंचायती आणि महापालिकांसाठी ओबीसी आरक्षण लागू केले होते.




