भाजपचे माजी नगरसेवक बच्चू वानरे यांंचा पत्रकार परिषदेत भंडाफोड

अन्नत्याग आंदोलनाचा इशारा

चांदूर रेल्वे/2 नोव्हेंबर : महाराष्ट्र सरकारने नगर परिषद, नगर पंचायत अध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी आरक्षण जाहीर केल्यानंतर, प्रारूप मतदार यादी प्रकाशित करण्यात आली. सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी अनेक प्रभागांमध्ये मतदारांच्या नावांमध्ये तफावत आणि गोंधळ असल्याचा आरोप करत तक्रारी दाखल केल्या. या तक्रारी काही प्रमाणात दूर करण्यात आल्या प्रशासनाला नाकी नव आले. परंतु काही प्रभागातील तक्रारीचे निराकरण झाले नाही यातप्रभाग क्रमांक एक मधील 40 ते 50 नावे प्रभाग क्रमांक दोन मध्ये टाकली असता तक्रारी नंतरही ती नावे प्रशासनाने जैसे थे ठेवण्यात आले ठेवण्यात आल्याचा आरोप माजी नगरसेवक बच्चू वानरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.
सर्व राजकीय पक्ष चांदूर रेल्वे नगरपालिकेवर प्रभाग रचनेत आणि प्रारूप यादीतील मतदारांच्या नावांमध्ये गोंधळ आणि अराजकता निर्माण केल्याचा आरोप करत आहेत. प्रभाग यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सर्व तक्रारी दाखल करण्यात आल्या.
नगर पालिका प्रशासनाने काही प्रभागांमधील मतदारांच्या नावांमध्ये गोंधळ दुरुस्त करण्यासाठी बीएलओना घरी पाठवले. परंतु तक्रार आल्यानंतरही पालिका प्रशासनाने समाधान कॉलनी येथील 40 ते 50 मतदारांची नावे प्रभाग क्रमांक 2 मध्ये ठेवली. त्यात सुधारणा करून ती प्रभाग क्रमांक 1 मध्ये समाविष्ट करण्यासाठी तक्रार दाखल करण्यात आली होती, परंतु पालिकेने ही नावे प्रभाग 2 मध्येच ठेवली. त्यामुळे भाजपचे माजी नगरसेवक बच्चू वानरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, गेल्या तीन निवडणुकांपासून ही नावे प्रभाग क्रमांक 1 च्या यादीत समाविष्ट आहेत. या निवडणुकीत त्यांना प्रभाग 2 मध्ये समाविष्ट करणे हे पालिका प्रशासनाचे षड्यंत्र आहे, ज्याविरुद्ध 4 नोव्हेंबरपासून अन्न त्या आंदोलन करण्याचा इशारा उपविभागीय कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. भाजपचे माजी नगरसेवक बच्चू वनरे, माजी शहराध्यक्ष बंडू भुते, माजी नगरसेविका स्वाती मेटे, बजरंग दलाचे गजानन ठाकरे आणि विशाल भोयर, माजी नगरसेवक अजय हजारे, विजय मिसाळ, पप्पू भालेराव, प्रविण्य देशमुख, धनराज राऊत, शैलेंद्र मेटे आणि इतर भाजप कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
दुर्लक्षित तक्रारी आणि अंतिम मतदार यादी प्रसिद्ध-स्थानिक नगरपालिका प्रशासनाकडून मतदारांच्या नावांमध्ये फेरफार केल्याचे आरोप 100% खरे असल्याचे सिद्ध होत आहे. एकाच कुटुंबात एकाच छताखाली राहणार्‍या पती/पत्नी, पत्नी, वडील, मुलगी किंवा कुटुंबातील सदस्यांच्या सहा नावांपैकी दोन नावे इतर प्रभागांमध्ये जोडण्यात आली, ज्यामुळे इच्छुक उमेदवारांना तक्रार दाखल करावी लागली. तथापि, स्थानिक राजकीय पक्ष पालिका प्रशासनावर तक्रारींकडे दुर्लक्ष करून अंतिम मतदार यादी प्रकाशित केल्याचा आरोप करत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button