राजनाथ सिंह दिसताच सुप्रिया सुळे पाया पडल्या
सर्वपक्षीय बैठकीत दिल्लीत हजेरी

नवी दिल्ली/19 जुलै : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पोर्शभूमीवर दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सरकराने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला अनेक नेते, मंत्री उपस्थित होते. विरोधी पक्षाचे नेतेही या बैठकीला आले होते. यातच देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह समोर दिसताच शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे पुढे सरसावल् या आणि थेट पाया पडल्या. याचा
व्हिडिओ समोर आला आहे. तृणमूल काँग्रेस आणि उद्धवसेनेचे बंडखोर खासदार या बैठकीला उपस्थित होते, त्यामुळे जोरदार वाद झाला. त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. मात्र, एका संक्षिप्त प्रतिकात्मक निषेधानंतर सर्व पक्ष बैठकीत पुन्हा सामील झाले. सत्ताधारी पक्ष आणि सर्व विरोधी पक्ष अधिवेशनासाठी सज्ज झाले आहेत. विशेष अधिवेशनात मंजूर न झालेली विधेयके मंजूर करण्यासाठी
केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, तर दुसरीकडे विरोधी पक्ष सरकारला कोंडीत पकडण्याचे मार्ग शोधत आहे.




