जिल्ह्यातील उर्वरित आठ तालुक्यांना विशेष मदत पॅकेजमध्ये समाविष्ट करा

जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या नेतृत्वात भाजपचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

अमरावती/10 ऑक्टोबर – राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या यादीमध्ये अमरावती जिल्ह्यातील आठ तालुक्यांना काही तांत्रिक बाबीमुळे वगळण्यात आले असून, त्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष दिसून येत आहे. त्यामुळे आज दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी भाजप जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजपा अमरावती ग्रामीण तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन उर्वरित आठ तालुक्यांना दिवाळीपूर्वी विशेष मदत पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्यासह शंतनु देशमुख, सुमित पवार, अमित बाबळुकर, सचिन इंगळे, अनिता तिखिले, साधनाताई मस्के, प्रणिता शिरभाते, श्रेया काळे, स्वप्निल भयुंकर, अशोकराव देशमुख, अमित कुचे, मनोहर बारसे, शाम साबळे, महेश पांडे, राजेंद्र मस्के, राजेश गापेने, अनुप भगत, अनुप तुळु, विवेक नवलाखे, रवी नवलाखे, राज सगणे, शरद मटेकर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांनी सांगितले की, भाजप सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना अमलात आणल्या आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भारतीय जनता पक्षाने त्यांना बळ दिले आहे. केंद्रातील माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे सरकार आणि राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे सरकार हे शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच कटिबद्ध आहे.

तथापि, नुकत्याच जाहीर झालेल्या शासन निर्णयामध्ये शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या यादीतून अमरावती जिल्ह्यातील आठ तालुके वगळण्यात आले आहेत. त्यामुळे या आठही तालुक्यांना दिवाळीपूर्वी विशेष मदत पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी करणारी पहिली पार्टी भारतीय जनता पक्ष असल्याचेही देशमुख यांनी नमूद केले. त्यांनी पुढे सांगितले की, आम्ही जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जाऊन नुकसानीची पाहणी केली असून, त्याचा अहवाल शासनाकडे पाठविला आहे. तरीही काही तांत्रिक कारणांमुळे जिल्ह्यातील आठ तालुके नुकसान भरपाईतून वगळले गेल्याने, अशा तालुक्यांना दिवाळीपूर्वी मदत जाहीर करावी, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांनी केली.

संबंधित बातम्या

Back to top button