बिहारमध्ये पुन्हा एनडीएचे सरकार स्थापन होणार

नवी दिल्ली– बिहारमध्ये पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला शह देण्यासाठी विरोधकांनी महाआघाडीची मोट बांधली आहे. यादरम्यान बिहारच्या मुख्यमंत्रिपदावरून अनेक कयास बांधले जात आहेत. बिहारमध्ये पुन्हा एनडीएचा विजय झाल्यास मुख्यमंत्री भाजपाचाच होईल आणि नितीश कुमार यांना दिल्लीत पाठवले जाईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर बिहारचे विद्यमान उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी ‘न्यूज 18’ला मुलाखत दिली, ज्यात त्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. तसेच त्यांनी बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला किती जागा मिळणार आहेत याचा आकडाही स्पष्ट केला.




