मोर्शी, अचलपुरात बदल, इतरत्र ‘जैसे थे’च
नगरपालिका, नगरपंचायतींची प्रभाग रचना प्रकाशित

* आज नगराध्यक्षांसाठी सोडत
अमरावती /5 ऑक्टोबर : येत्या काळात होऊ घातलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील 10 नगरपालिका व चारपैकी दोन नगरपंचायतींची प्रभाग रचना अंतिमतः प्रकाशित करण्यात आली आहे. अचलपुर आणि मोर्शी नगरपालिकेच्या प्रभाग रचनेत काहीसा बदल करण्यात आला असून, इतर ठिकाणची रचना ‘जैसे थे’ राहिली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व 10 नगरपालिका आणि चारही नगरपंचायतीमधील मतदारसंघांची रचना निश्चित केल्यानंतर तयार झालेले वार्डनिहाय नकाशे नागरिकांच्या अवलोकनार्थ उपलब्ध करुन देण्यात आले होते. त्यानंतर त्यावरील हरकती व सूचनांची सुनावणी घेण्यात आली आणि सुनावणी अहवाल नगरपालिका प्रशासनाद्वारे राज्य निवडणूक आयोगाच्या स्वाधीन करण्यात आला. आयोगाने मान्यता दिल्यानंतर हा अहवाल पुन्हा नागरिकांच्या अवलोकनार्थ सर्व नगरपालिका व नगरपंचायतींच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आला आहे.
हरकती व सूचनेच्या काळात अंजनगाव नगरपालिकेच्या प्रारुप रचनेवर सर्वाधिक 12 आक्षेप नोंदविण्यात आले, त्याखालोखाल दर्यापुरकडे 9 आणि अचलपुरकडे 8 नागरिकांतर्फे आक्षेप नोंदविण्यात आले. माशीरीच्या प्रारुप रचनेवर 6 नागरिकांनी तक्रार केली, तर वरुड नगरपालिका व नांदगाव खंडेश्वर व धारणी नगरपंचायतींच्या प्रभाग रचनांवर प्रत्येकी 4 जणांनी हरकती नोंदवली. चांदूर, धामणगाव व चांदूर बाजार येथे प्रत्येकी एक तक्रार प्राप्त झाली. जिल्हाभरात एकूण 52 तक्रारी नोंदवल्या गेल्या. अचलपुरच्या आठ तक्रारींपैकी दाने तक्रारी ग्रहणात धरली गेली आणि एक माठे वस्ती एका प्रभागात एकाच नावाने दाखल केली गेली, जी आता एका प्रभागात कायम ठेवण्यात आली असून दुसऱ्या प्रभागात त्या वस्तीचा उर्वरीत भाग लिहिण्यात आला आहे. माशीरीच्या 6 तक्रारींपैकी एक तक्रार मान्य करून त्या नकाशात बदल करण्यात आला. विशेष बाब म्हणजे चिखलदरा व शेंदूर जनाघाटमधील प्रभाग रचनेवर कोणतीही आक्षेप नोंदवली गेली नाही.
सामेवारी नगराध्यक्षासाठी साडे सातवाडरी निहाय रचना (नकाशा) अंतिमतः तयार झाली असून, काही दिवसांत या वाडरींमध्ये आरक्षित वाडरींचे आणि महिलांसाठी राखीव वाडरी ठरविण्याचा टप्पा पूर्ण केला जाणार आहे. त्याआधी राज्य निवडणूक आयोग उद्या, सोमवारी, 6 ऑक्टोबर रोजी नगराध्यक्षपदाचे आरक्षण ठरविण्यासाठी मुंबईत साडे सातवाजता बैठक घेणार आहे.




