नेपाळमध्ये अडकले महाराष्ट्राचे 150 पर्यटक

मुंबई / 10 सप्टेंबर : नेपाळमध्ये समाजमाध्यमांवरील बंदीविरोधात स्थानिक तरुणांनी केलेल्या निदर्शनांना हिंसक वळण लागल्याने तेथील परिस्थिती चिघळली असून याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून पर्यटनासाठी गेलेले सुमारे 150 पर्यटक अडकून पडले आहेत. या पर्यटकांमध्ये ठाण्यातील 67, पुण्यातील 19, तर बीड जिल्ह्यातील 11 पर्यटकांचा समावेश असून इतर लातूर, कोल्हापूर, अकोला, यवतमाळ आदी जिल्ह्यांतील नागरिकांचाही सहभाग आहे. हे सर्व पर्यटक सुखरूप असले तरी परिस्थिती पाहता राज्य सरकारने नागरिकांना सध्या नेपाळमध्ये प्रवास करु नये, असे आवाहन केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button